‘रंगून’ म्हणजे म्युझिकल ट्रीट! -सुखविंदर सिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2016 17:31 IST2016-12-31T17:28:55+5:302016-12-31T17:31:48+5:30
कंगना राणौत, सैफ अली खान आणि शाहिद कपूर यांचा आगामी चित्रपट ‘रंगून’ सध्या चर्चेत आहे. दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांचा ...
(2).jpg)
‘रंगून’ म्हणजे म्युझिकल ट्रीट! -सुखविंदर सिंग
क गना राणौत, सैफ अली खान आणि शाहिद कपूर यांचा आगामी चित्रपट ‘रंगून’ सध्या चर्चेत आहे. दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांचा ‘रंगून’ चित्रपट म्हणजे प्रेक्षकांसाठी खास ट्रीटच आहे, असे आम्ही नव्हे तर राष्ट्रीय पुरस्कार विजेता गायक सुखविंदर सिंग म्हणत आहेत.
‘ओमकारा‘, ‘कमिने’,‘इश्किया’,‘हैदर’ या चित्रपटातून भारद्वाज-सुखविंदर सिंग ही जोडी बॉलिवूडमध्ये एक यशस्वी जोडी मानली जाते. त्यांच्यासोबत शाहिदही मुख्य भूमिकेत चित्रपटात असतोच. आगामी चित्रपट ‘रंगून’ विषयी सुखविंदर म्हणाले,‘रंगून हा चित्रपट खूप मोठा आणि प्रेक्षकांना कर्णसुख देणारा असणार आहे. यातील गाणी ही ‘ओपेरा’ सारखी संगीताची मेजवानी देणारी आहेत. या चित्रपटाचे विशेष हे आहे की, या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन आणि संगीत हे विशाल भारद्वाज यांचे आहे. चित्रपटाचे कथानक, संगीत यातच खरे यश असते. विशालच्या बाबतीत या दोन्ही गोष्टी उत्तमप्रकारे हाताळलेल्या आहेत. कथानकावर आधारित ही गाणी असल्याने प्रेक्षकांना नक्की आवडतील याची मला खात्री आहे.’
‘रंगून’ या चित्रपटाचे शूटिंग बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे. सैफ अली खान आणि करिना कपूर खान यांना बाळ होणार असल्याने या चित्रपटादरम्यान अनेकदा सैफसाठी शूटिंग पुढे ढकलावं लागलं. चित्रपटाचे पोस्ट प्रोडक्शनचे काम सध्या सुरू असून, आता चित्रपटाचे पोस्टर्स, गाणी, ट्रेलर, टिझर लवकरच लाँच होतील.
![]()