‘रंगून’ पुन्हा वादात...वाचा, यामागचे कारण!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2017 15:14 IST2017-03-07T09:44:25+5:302017-03-07T15:14:25+5:30
विशाल भारद्वाज दिग्दर्शित ‘रंगून’ पुन्हा एकदा वांद्यात सापडला आहे. होय, सेन्सॉर प्रमाणपत्राविना ‘रंगून’ देशभरातील चित्रपटगृहांमध्ये दाखवला जात आहे. सेन्सॉर ...

‘रंगून’ पुन्हा वादात...वाचा, यामागचे कारण!!
व शाल भारद्वाज दिग्दर्शित ‘रंगून’ पुन्हा एकदा वांद्यात सापडला आहे. होय, सेन्सॉर प्रमाणपत्राविना ‘रंगून’ देशभरातील चित्रपटगृहांमध्ये दाखवला जात आहे. सेन्सॉर बोर्डाने याची गंभीर दखल घेतल्याचे कळतेय. त्यामुळे लवकरच ‘रंगून’च्या मेकर्सवर सेन्सॉर बोर्डाचा दणका बसू शकतो.
चित्रपटापूर्वी अॅन्टी स्मोकिंग शॉर्टही दाखवणे अनिवार्य असताना अनेक चित्रपटगृहांमध्ये ‘रंगून’पूर्वी असे लघूपट दाखवले जात नसल्याचेही समोर आले आहे. सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी याची दखल घेतली आहे. देशभरातील अनेक चित्रपटगृहांत ‘रंगून’ सेन्सॉर सर्टिफिकेट व अॅन्टी स्मोकिंग शॉर्टशिवाय दाखवला जात आहे. आमच्याकडे अशा तक्रारी आल्या आहेत. या दोन्ही गोष्टी चित्रपटापूर्वी दाखवणे अनिवार्य आहे. कारण चित्रपटातील कलाकार स्मोकिंग व ड्रिंक करताना दिसत आहेत, असे निहलानी म्हणाले. आम्ही ‘रंगून’च्या मेकर्सनला ओपनिंग क्रेडिट लाईनमध्ये एक डिस्क्लेमर टाकायला सांगितले होते. ते डिस्क्लेमरही मिसींग आहे. चित्रपटापूर्वी व मध्यंतरादरम्यान अॅन्टी स्मोकिंग शॉर्ट फिल्म नाहीत. कायद्यानुसार, सेन्सॉर बोर्ड सर्टिफिकेट दाखवणे बंधनकारक आहे. पण मेकर्सनी त्याकडेही दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे आम्ही डिजिटल आॅपरेटर्सविरूद्ध कायदेशीर कारवाई करू शकतो. हे प्रकरण गंभीर आहे, असेही ते म्हणाले,
‘रंगून’मध्ये अभिनेत्री कंगना राणौत हिने जांबाज ज्युलियाची भूमिका साकारली आहे. तिच्या या व्यक्तिरेखेवरून आणि चित्रपटातील काही सीन्सवरून हा चित्रपट यापूर्वी वादात सापडला होता. गत २४ फेबु्रवारीला हा चित्रपट रिलीज झाला. मात्र बॉक्सआॅफिसवर त्याला अपेक्षित यश मिळू शकले नाही. यातील कंगना राणौत, शाहिद कपूर आणि सैफ अली खान यांच्या अभिनयाचे कौतुक झाले असले तरी दमदार पटकथेअभावी हा चित्रपट आपटला.