चल फूट यहां से...! हृतिक रोशनवर पुन्हा भडकली कंगनाची बहीण रंगोली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2019 11:40 IST2019-07-09T11:39:26+5:302019-07-09T11:40:52+5:30

कंगना राणौत आणि हृतिक रोशन यांच्यातील वाद तूर्तास तरी थांबण्याची चिन्हे नाहीत. ‘सुपर 30’ या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान हृतिकने कंगनाच्या नावाचा उल्लेख न करता, तिच्यावर निशाणा साधला आणि यामुळे कंगनाची बहीण रंगोली भडकली.

rangoli chandel lashes out hrithik roshan for his statement against kangana ranaut | चल फूट यहां से...! हृतिक रोशनवर पुन्हा भडकली कंगनाची बहीण रंगोली

चल फूट यहां से...! हृतिक रोशनवर पुन्हा भडकली कंगनाची बहीण रंगोली

ठळक मुद्दे कंगनाविरोधातल्या केसचे काय झाले, असा प्रश्न ताज्या मुलाखतीत हृतिकला विचारण्यात आला होता. यावर हृतिकने उत्तर दिले.

कंगना राणौत आणि हृतिक रोशन यांच्यातील वाद तूर्तास तरी थांबण्याची चिन्हे नाहीत. ‘सुपर 30’ या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान हृतिकने कंगनाच्या नावाचा उल्लेख न करता, तिच्यावर निशाणा साधला आणि यामुळे कंगनाची बहीण रंगोली भडकली. मग काय, ट्विटरवर तिने आपली सगळी भडास काढली.
‘ये देखो अंकल जी फिर से शुरू हो गए. अरे चल भाई आगे बढ. थोडे थोडे दिनों बाद बेइज्जती के डोज की लत गई है शायद. तेरे लिए मेरे पास कोई डोज नहीं है. चल फूट यहां से...,’ अशा शब्दांत तिने हृतिकला लक्ष्य केले.



 

हृतिक काय म्हणाला...
 कंगनाविरोधातल्या केसचे काय झाले, असा प्रश्न ताज्या मुलाखतीत हृतिकला विचारण्यात आला होता. यावर हृतिकने उत्तर दिले.  ‘मी त्या स्त्रीविरोधात कुठलीही लीगल केस केलेली नाही आणि मी तसे करू शकलो नाही. गुंडगिरी किंवा दादागिरीला त्यांच्याच शब्दात प्रत्युत्तर देण्याऐवजी संयम बाळगून शांतपणे त्याचा सामना करायला हवा, हे मला कळून चुकले आहे. कारण मी कायदेशीर भाषेत प्रत्युत्तर दिले तरी, मी आक्रस्ताळा ठरणार आणि नाही दिले तर मी खोटा ठरणार. मी अशा कुठल्याही टोकाच्या प्रतिक्रियांपासून स्वत:ला दूर ठेवायला शिकलो आहे. याचा त्रास करून घ्यायचा नाही, असे मी स्वत:च ठरवले आहे. त्यासाठी संयम बाळगायला शिकलो आहे. असत्य गोष्टींसाठी ‘आवाज उठवणा-या’ आणि ते करताना विजयी प्रौढी मिरवणा-या प्रवृत्तींबद्दल मला राग आहे. गेली 6 वर्षे या अशा प्रवृत्तींमुळेच ही सर्कस सुरू आहे’, असे त्याने सांगितले.
 प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात हे लक्षात घ्यायला हवे, असेही तो म्हणाला.

Web Title: rangoli chandel lashes out hrithik roshan for his statement against kangana ranaut