रणधीर कपूर यांना नातवाची घाई!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2016 20:49 IST2016-06-02T15:19:27+5:302016-06-02T20:49:27+5:30
करिना कपूर आणि सैफ अली खान यांच्याकडे गुड न्यूज असल्याची चर्चा आहे. करिना साडे तीन महिन्यांची पे्रग्नंट आहे, ही ...

रणधीर कपूर यांना नातवाची घाई!
क िना कपूर आणि सैफ अली खान यांच्याकडे गुड न्यूज असल्याची चर्चा आहे. करिना साडे तीन महिन्यांची पे्रग्नंट आहे, ही बातमी ऐकून सगळ्यांनाच आनंद झाला आहे. अर्थात अद्याप करिना वा सैफ यांनी याबाबत खुलासा केलेला नाही. मात्र करिनाचे वडील रणधीर कपूर यांनी मात्र या मुद्यावर चुप्पी तोडली आहे. होय, करिनाचे वजन सध्या वाढलेले आहे. करिना व सैफ अलीकडे लंडनला गेले होते. लंडनमध्ये करिनाला एका प्रीनेटल क्लिनिकमध्ये जातांना बघितले गेले. यामुळे करिना प्रेग्नंट असल्याच्या बातमीला आणखीच हवा मिळाली. करिना येत्या आठवड्यापासून ‘उडता पंजाब’ या तिच्या अपकमिंग मुव्हीचे प्रमोशन करणार आहे. यावेळी करिनाला प्रेग्नंसीबाबत अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागेल. करिना या प्रश्नांना कशी सामोरी जाते, ते बघूच. तत्पूर्वी करिनाच्या पप्पांना करिनाच्या प्रेग्नंसीबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर थेट बोलणे रणधीर कपूर यांनी टाळले. करिनाने अद्याप मला काहीही सांगितलेले नाही. पण करिनाच्या प्रेग्नंसीची गोष्ट खरी व्हावी, अशीच माझी इच्छा आहे. कारण, त्यांनी बाळाबद्दल विचार करण्याची हीच योग्य वेळ आहे, असे रणधीर कपूर म्हणाले...करिना, बाबांना घाई झालीयं, नातवाची...आता तुच काय ते सांगा बाबा...!!