रणदीपचा आॅस्ट्रेलियात गौरव
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2016 09:10 IST2016-02-29T16:10:47+5:302016-02-29T09:10:47+5:30
जिद्द, चिकाटी आणि अपार कष्ट घेण्याची तयारी या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक स्वतंत्र ओळख निर्माण करणारा अभिनेता रणदीप हुड्डा ...

रणदीपचा आॅस्ट्रेलियात गौरव
ज द्द, चिकाटी आणि अपार कष्ट घेण्याची तयारी या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक स्वतंत्र ओळख निर्माण करणारा अभिनेता रणदीप हुड्डा याला अलीकडे आॅस्ट्रेलियात गौरवण्यिात आले. दक्षिण भारतीय समुदायाच्या वतीने आयोजित कार्यक्रयात रणदीपला त्याने बॉलिवूडमध्ये दिलेल्या योगदानासाठी अचिव्हमेंट अवार्डने सन्मानित करण्यात आले.यावेळी रणदीपने आपल्या अनेक आठवणींना उजाळा दिला. माझे आॅस्ट्रेलियन उच्चार चांगले होते. त्यामुळेच बॉलिवूडमध्ये मला पहिली संधी मिळाली, असा एक किस्सा त्याने शेअर केला. २००१ मध्ये आलेला ‘मान्सून वेडिंग’ हा रणदीपचा पहिला चित्रपट होता. यात रणदीपने एका अनिवासी भारतीयाची भूमिका साकारली होती.