रणदीपला होतोय पश्चात्ताप ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2016 11:17 IST2016-06-16T05:44:58+5:302016-06-16T11:17:06+5:30
‘सरबजीत’ चित्रपटामुळे रणदीप हुडा याचे नाव सध्या बी टाऊनच्या सर्वांत चांगल्या अभिनेत्यांमध्ये घेतले जात आहे. बॉक्स आॅफीसवर चित्रपटाला उत्तम ...
.jpg)
रणदीपला होतोय पश्चात्ताप ?
सरबजीत’ चित्रपटामुळे रणदीप हुडा याचे नाव सध्या बी टाऊनच्या सर्वांत चांगल्या अभिनेत्यांमध्ये घेतले जात आहे. बॉक्स आॅफीसवर चित्रपटाला उत्तम प्रतिसाद तर मिळालाच त्याशिवाय समीक्षक आणि चाहत्यांकडूनही त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. मग एवढा चांगला अभिनेता त्याला कसला पश्चात्ताप होतोय असे वाटतेय ना तुम्हाला?
नुकतेच एका मुलाखतीदरम्यान बोलताना तो थोडासा भूतकाळात रमला आणि म्हणाला,‘ मी जेव्हा ‘हायवे’ चित्रपटासाठी शूटींग करत होतो. तेव्हा नेहमी माझ्या मनात एकच बाब होती. ती म्हणजे दिग्दर्शक इम्तियाज अली हे आलिया भट्ट महेश भट्ट यांची मुलगी आहे म्हणून तिला थोडंसं वेगळं अटेंशन देत आहेत. पण तसे नव्हते. मी खुप चुकीचे वागलो. पण इम्तियाजनी मला खुप सांभाळून घेतलं. एकदा तर रागारागात मी माझी रूमच फोडली. तरी ते काहीच म्हणाले नाहीत. संपूर्ण रात्र माझ्याजवळ बसून राहिले. माझा राग शांत होऊ दिला.’