​ रणदीप हुडा सेटवर झाला बेशुद्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2016 17:08 IST2016-04-18T11:38:05+5:302016-04-18T17:08:05+5:30

सलमान खानच्या ‘सुल्तान’मध्ये रणदीप हुडा याचीही महत्त्वाची भूमिका आहे, हे आपण जाणताचं. सध्या दिल्लीत ‘सुल्तान’ची शूटींग सुरु आहे.याचदरम्यान रणदीप ...

Randeep Hooda was unconscious on the set | ​ रणदीप हुडा सेटवर झाला बेशुद्ध

​ रणदीप हुडा सेटवर झाला बेशुद्ध

मान खानच्या ‘सुल्तान’मध्ये रणदीप हुडा याचीही महत्त्वाची भूमिका आहे, हे आपण जाणताचं. सध्या दिल्लीत ‘सुल्तान’ची शूटींग सुरु आहे.याचदरम्यान रणदीप बेशुद्ध पडला. रणदीप एक एक शॉट्स देत असताना अचानक वेदनेने तडफडत सेटवर बेशुद्ध पडला. यानंतर लगेच त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले. सूत्रांच्या मते, रणदीपला अपेंडिक्सचा त्रास झाल्याने तो बेशुद्ध पडला. रणदीप सध्या रूग्णालयात आहे. येथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे.. रणदीपला गेल्या अनेक दिवसांपासून त्रास होत होता. मात्र शूटींगमुळे त्याने याकडे दुर्लक्ष चालवले होते. सलमाननेही रणदीप डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला दिला होता. मात्र रणदीपने तो मानला नाही आणि अखेर त्याला रूग्णालयात दाखल व्हावेच लागले. अली अब्बास जफर दिग्दर्शित ‘सुल्तान’मध्ये रणदीप हा सलमानच्या कोचची भूमिका साकारत आहे. याशिवाय ‘लाल रंग’ हा रणदीपचा चित्रपटही येतोय. त्याच्या प्रमोशनमध्येही तो बिझी आहे. या आठवड्यात हा चित्रपट रिलीज होतो आहे. याशिवाय ‘सरबजीत’मध्येही रणदीप दिसणार आहे.  या सगळ्यांमुळे रणदीपचे शेड्यूल सध्या चांगलेच टाईट आहे. पुरेशा विश्रांतीसाठी वेळ मिळत नसल्याने त्याचा त्रास वाढला आहे..

Web Title: Randeep Hooda was unconscious on the set

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.