रणदीप हुड्डा म्हणतो, ट्रोलर्सना तातडीने ब्लॉक करा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2017 16:05 IST2017-03-11T10:35:09+5:302017-03-11T16:05:09+5:30
गुरमेहर कौरला ट्विटरवर ट्रोल करणारा अभिनेता रणदीप हुड्डाला आता उपरती झाली आहे. ‘ट्रोलर्सना तातडीने ब्लॉक करायला हवे’ असे त्याने ...

रणदीप हुड्डा म्हणतो, ट्रोलर्सना तातडीने ब्लॉक करा!
ग रमेहर कौरला ट्विटरवर ट्रोल करणारा अभिनेता रणदीप हुड्डाला आता उपरती झाली आहे. ‘ट्रोलर्सना तातडीने ब्लॉक करायला हवे’ असे त्याने मत व्यक्त केले.
रणदीप म्हणतो, ‘ हजारो लोक उड्या मारेपर्यंत संवाद साधण्यास तयार नसता. तुम्ही ज्याला ट्रोलिंग म्हणता हे अत्यंत वादग्रस्त असतात. जे लोक असे करतात, त्यांना ट्विटरवर तातडीने ब्लॉक करायला हवे. त्यांना गाळण्यात आले पाहिजे.’
रणदीप हुड्डा याने गुरमेहरसंदर्भात ट्विटरवर ट्विट केले होते. त्याविषयी बोलताना तो म्हणाला, ‘मी वीरेंद्र सेहवागच्या विनोदावर हसलो होते. काही लोकांचा असा अजेंडा असतो, त्याला टोला होता. मलाही ती कोण होती, हे माहिती नव्हते. मला धमकीची भीती वाटत नाही. त्यानंतर मी यासंदर्भात खुलासा केला. कोणतीही हिंसा चुकीची आहे. तुम्ही एखाद्या मताबाबत असहमत असाल तर तसे तुम्ही सांगावे. तुम्ही माझे मत बदलू शकाल. मला वाटते, माझे ट्विटर हँडल हे पालकांच्या मार्गदर्शनानुसारच चालले पाहिजे’.
एखाद्या महिलेला हिंसेची धमकी देणे हा सर्वात मोठा गुन्हा आहे. याविरूद्ध तातडीने न्याय केला पाहिजे.’
सामाजिक माध्यमे तुम्हाला बरेच काही शिकवितात. तुमच्या विचारांशी सहमत असणारे अनेक जण तुम्हाला भेटू शकतात. चांगले आणि वाईट प्रकारचे लोक समाजात असतातच. सामाजिक माध्यमे हा नवीन प्रकार आहे. हा प्रकार आल्यानंतर विचारांचा नवा प्रवाह आला आहे. किमान लोक आपला आवाज उठवत आहेत.’