Leaked!​ ‘बॅटल आॅफ सारागढी’मध्ये असा दिसणार रणदीप हुड्डा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2017 10:16 IST2017-04-09T04:46:52+5:302017-04-09T10:16:52+5:30

अभिनेता रणदीप हुड्डा सध्या ‘बॅटल आॅफ सारागढी’ या चित्रपटात बिझी आहे. रणदीपचे चाहते निश्चितपणे त्याच्या या चित्रपटाकडे डोळे लावून ...

Randeep Hooda looks like 'Battle of Saragarhi' in Leaked! | Leaked!​ ‘बॅटल आॅफ सारागढी’मध्ये असा दिसणार रणदीप हुड्डा!

Leaked!​ ‘बॅटल आॅफ सारागढी’मध्ये असा दिसणार रणदीप हुड्डा!

िनेता रणदीप हुड्डा सध्या ‘बॅटल आॅफ सारागढी’ या चित्रपटात बिझी आहे. रणदीपचे चाहते निश्चितपणे त्याच्या या चित्रपटाकडे डोळे लावून बसलेले आहेत. तेव्हा या चाहत्यांसाठी आम्ही खास बातमी घेऊन आलो आहोत. होय, ‘बॅटल आॅफ सारागढी’मधील रणदीपचा फर्स्ट लूक आम्ही घेऊन आलो आहोत. वाढलेली दाढी, ताव दिलेल्या मिशा, डोक्यावर पगडी आणि अंगावर पोलिसांची खाकी वर्दी अशा हटके अवतारात तो यात दिसतो आहे.

{{{{twitter_post_id####}}}}


चित्रपटातील आपल्या परफेक्ट लूकसाठी रणदीप किती मेहनत घेतो, हे आपण यापूर्वी बघितले आहेच. ‘सरबजीत’ या चित्रपटासाठी बरेच वजन कमी केले होते. ‘बॅटल आॅफ सारागढी’ या चित्रपटासाठीही तो अशीच मेहनत घेतो आहे. या चित्रपटाची कथा पंजाबच्या अवती-भोवती फिरणारी आहे. रणदीपने त्यामुळेच यासाठी पर्सनली बराच रिसर्च केला. शिख धर्माचा त्याने अत्यंत बारकाईने अभ्यास केला.  खुद्द रणदीपने अलीकडे एका मुलाखतीत हे सांगितले होते. शिख धर्माबद्दल मी प्रचंड अभ्यास केला. या धर्माबद्दल मी जितके जाणले, तितका माझा आदर वाढत गेला. शिख धर्माचा अर्थ शिकत राहा, असा होता, असे तो म्हणाला होता.

ALSO READ : रणदीपने वाचवले ‘त्या’ घोड्याचे प्राण

दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांच्या यांच्या ‘बॅटल आॅफ सारागढी’ या चित्रपटात रणदीप एक शिख व्यक्तिरेखा साकारणार आहे. निश्चितपणे ही भूमिका रणदीपच्या आधीच्या सर्व भूमिकांपैकी वेगळी व आव्हानात्मक आहे. चित्रपटाचे कथानक  १८९७ च्या लढाईत  वीरमरण आलेल्या २१ शीखांवर आधारलेले आहे.  या लढाईत ब्रिटीश आर्मीच्या शिख रेजिमेंटच्या  २१ शिपायांनी प्राणांचे बलिदान देत तब्बल दहा हजार अफगाणींना रोखून धरले होते.  रणदीप या चित्रपटात हवालदार ईश्वर सिंह याची भूमिका साकारताना दिसणार आहे.

Web Title: Randeep Hooda looks like 'Battle of Saragarhi' in Leaked!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.