जोयाच्या चित्रपटात रणवीर साकारणार ‘ही’ भूमिका!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2016 18:55 IST2016-09-08T13:25:01+5:302016-09-08T18:55:01+5:30
रणवीर सिंह सध्या ‘पद्मावती’मुळे चर्चेत आहे. संजय लीला भन्साळींच्या या चित्रपटात रणवीर अलाऊद्दीन खिल्जीची भूमिका साकारणार आहे. पण या ...

जोयाच्या चित्रपटात रणवीर साकारणार ‘ही’ भूमिका!
र वीर सिंह सध्या ‘पद्मावती’मुळे चर्चेत आहे. संजय लीला भन्साळींच्या या चित्रपटात रणवीर अलाऊद्दीन खिल्जीची भूमिका साकारणार आहे. पण या चित्रपटाआधी रणवीरने जोया अख्तरच्या चित्रपटास होकार कळवला होता. सूत्रांच्या मते, येत्या डिसेंबरपासून याची शूटींग सुरु होणार आहे. जोयाच्या या चित्रपटात रणवीर एका रॅपरच्या भूमिकेत दिसणार आहे. झोपडपट्टीत राहणारा एक तरूण रॅपर बनतो. याच तरूणाची भूमिका रणवीर साकारणार आहे. ही भूमिका धारावीतील सुप्रसिद्ध बँड ‘स्लमगॉड्स’पासून प्रेरित आहे. रणवीरने याआधी कुठल्याही चित्रपटात रॅपर साकारलेला नाही. त्यामुळे साहजिकच या भूमिकेबद्दल रणवीर प्रचंड एक्साइटेड आहे. या भूमिकेची तयारीही रणवीरने सुरु केली आहे. यासाठी तो हिप-हॉप सेशन करतोय, स्लम एरियामधील मुलांचे मॅनर्स शिकतो आहे. अर्थात रणवीरची ही मेहनत किती फळास येते, हे पाहण्यासाठी आपल्याला प्रतीक्षा करावी लागणार आहेच.