वयाच्या चाळीशीत रणबीर दिसतोय विशीतला तरुण, अभिनेत्याच्या क्लीन शेव्ह लूकवर चाहते फिदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 13:03 IST2025-06-06T13:03:13+5:302025-06-06T13:03:50+5:30

बॉलिवूडचा हँडसम अभिनेता रणबीर कपूरचा लूक पाहून चाहते अवाक

Ranbir looks like a 20 year old at the age of 40 fans are amazed by the actor s clean shaven look | वयाच्या चाळीशीत रणबीर दिसतोय विशीतला तरुण, अभिनेत्याच्या क्लीन शेव्ह लूकवर चाहते फिदा

वयाच्या चाळीशीत रणबीर दिसतोय विशीतला तरुण, अभिनेत्याच्या क्लीन शेव्ह लूकवर चाहते फिदा

बॉलिवूडचा हँडसम अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आगामी 'रामायण' सिनेमात दिसणार आहे. यामध्ये तो प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत आहे. 'रामायण'साठी रणबीर कपूरचा क्लीन शेव्ह लूक व्हायरल होत आहे. अभिनेता अगदी विशीतलाच दिसत असल्याचं नेटकरी म्हणत आहे. त्याच्या या यंग लूकवर चाहते फिदा झालेत. पापाराझींनी त्याला कॅमेऱ्यात कैद केलं तेव्हाचा व्हिडिओ आता व्हायरल होतोय.

लाल टीशर्ट, जीन्स आणि निळी टोपी अशा कॅज्युअल लूकमध्ये रणबीर कपूर दिसला. मुंबईतील एका स्टुडिओबाहेर पडताना त्याला कॅमेऱ्यात  कॅप्चर करण्यात आलं. त्याच्या क्लीन शेव्ह लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. तसंच त्याची फिजीकलीही तो एकदम फिट, स्लिम अँड ट्रीम लूकमध्ये दिसत आहे. कूल बायसेप्सही तो फ्लॉन्ट करत आहे. अॅनिमल मधला लांब दाढीवाला रणबीर हाच होता का असाच प्रश्न अनेकांना पडला असेल. इतका त्याच्या लूकमध्ये बदल झालेला दिसतोय. वयाच्या चाळीशीत तो अगदी विशीतला तरुणच दिसतोय.


'चाळीशीत वेक अप सिड ट्रान्सफॉर्मेशन, अविश्वसनीय', 'तो विशीतला दिसतोय, किती क्युट', 'कॉमेजमधला तरुणच वाटतोय' अशा कमेंट्स चाहत्यांनी व्हिडिओवर केल्या आहेत. तसंच व्हिडिओमध्ये तो पापाराझींसोबत मस्तीही करतोय आणि त्यांना फोटो काढण्यासाठी सहकार्यही करताना दिसत आहे. त्यांच्या खांद्यावर हात ठेवून एकदम मैत्रीपूर्ण व्हाईब देत आहे. रणबीरच्या या स्वभावाचंही अनेकांनी कौतुक केलं आहे.

रणबीर कपूरचा हा लूक 'रामायण'साठी आहे. शिवाय तो आगामी 'लव्ह अँड वॉर' सिनेमातही दिसणार आहे. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित या सिनेमात आलिया भट आणि विकी कौशल आहेत. तसंच रणबीर 'धूम ४'मध्ये दिसणार असल्याच्या चर्चा आहेत.

Web Title: Ranbir looks like a 20 year old at the age of 40 fans are amazed by the actor s clean shaven look

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.