रणबीरला खटकू लागलीयं ‘प्लेबॉय’ इमेज!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2016 13:37 IST2016-11-02T13:32:48+5:302016-11-02T13:37:17+5:30
‘ऐ दिल है मुश्किल’मधील ऐश्वर्यासोबतच्या आॅनस्क्रीन केमिस्ट्रीमुळे रणबीर कपूर सध्या चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटात रणबीरने रंगवलेला ‘प्लेबॉय’ सगळ्यांनाच ...

रणबीरला खटकू लागलीयं ‘प्लेबॉय’ इमेज!!
‘ दिल है मुश्किल’मधील ऐश्वर्यासोबतच्या आॅनस्क्रीन केमिस्ट्रीमुळे रणबीर कपूर सध्या चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटात रणबीरने रंगवलेला ‘प्लेबॉय’ सगळ्यांनाच खूप आवडला. पण रिअल लाईफमध्येही रणबीर ‘प्लेबॉय’चं ठरतो आहे. ‘ऐ दिल है मुश्किल’च्या आधी रणबीर त्याच्या लव्हलाईफमुळे चर्चेत होता. कॅटरिना कैफसोबत त्याचे झालेले ब्रेकअप अनेकार्थाने गाजले. त्याआधी दीपिका पादुकोण हिच्यासोबतच्या त्याच्या ‘प्रेम कहाणी’चा अध्याय गाजला. त्याहीपूर्वी सोनम कपूरसोबत त्याचे नाव जुळले. पण रणबीर याविषयी मोकळेपणाने काहीही बोलला नाही. कॅटरिना आयुष्यात येण्याच्या आधी जवळपास तीन वर्षे रणबीर दीपिकासोबत रिलेशनशिपमध्ये होता. पण या दोघींसोबतही रणबीरचे रिलेशनशिप फार काळ टिकू शकले नाही. याचाच परिणाम म्हणजे ‘प्लेबॉय’ अशीच रणबीरची इमेज झाली. पण कदाचित ही इमेज रणबीरला आताश: खटकू लागली आहे. कदाचित त्यामुळेच तो याबद्दल जाहीरपणे बोलू लागला आहे. एका कार्यक्रमात रणबीर याविषयी बोलला. ‘दोन अभिनेत्रींसोबतचे ब्रेकअप आणि माझ्या करिअरच्या अगदी सुरुवातीच्या काळात मी केलेल्या काही चित्रपटांमुळे दुर्दैवाने लोक मला ‘प्लेबॉय’आणि ‘सिरिअल डेटर’ ठरवून मोकळे झालेत. हे काहीप्रमाणात सत्य आहे. पण पूर्णपणे सत्य नाही,’असे रणबीर यावेळी म्हणाला. आता ‘काहीप्रमाणात सत्य’ याचा खुलासा मात्र त्याने केला नाही. पण तो हे बोलला. आता याचा अर्थ त्याला स्वत:लाच ठाऊक़ पुढे मागे कदाचित रणबीर याचाही खुलासा करेल. तोपर्यंत प्रतीक्षा ही आलीच.