रणबीर-कॅटरिना मोरोक्कोत ‘डबल-अप’ !
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2016 10:00 IST2016-05-27T04:30:48+5:302016-05-27T10:00:48+5:30
रणबीर कपूर आणि कॅटरिना कै फ हे सध्या अनुराग बासु दिग्दर्शित चित्रपट ‘जग्गा जासूस’ साठी मोरोक्कोत शूटींग करत आहेत. ...

रणबीर-कॅटरिना मोरोक्कोत ‘डबल-अप’ !
र बीर कपूर आणि कॅटरिना कै फ हे सध्या अनुराग बासु दिग्दर्शित चित्रपट ‘जग्गा जासूस’ साठी मोरोक्कोत शूटींग करत आहेत. दोघांचेही काही फोटो सध्या व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये ते त्यांच्या बॉडी डबल्ससोबत दिसत आहेत.
‘जग्गा जासूस’ हा चित्रपट बासु आणि रणबीर कपूर निर्मित आहे. एक किशोरवयीन डिटेक्टिव्ह मुलगा त्याच्या हरवलेल्या वडिलांच्या शोधात निघतो अशी या चित्रपटाची कथा आहे. हा चित्रपट काही प्रमाणात कॉमेडी असून अनुरागने बॉलीवूडला एका वेगळ्या प्रकारच्या चित्रपटाची ओळख करून दिली आहे.
त्यावर रणबीर म्हणतोय की,‘ मला माझे तरूण डिटेक्टिव्हचे कॅरेक्टर फार आवडले आहे. त्याच्या वडिलांना तो शोधायला निघाला आहे. इंदियाना जोन्स आणि टिनटिन यांचे आव्हानात्मक चित्रपट असतात तशाप्रकारचा हा चित्रपट बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
उशीर होऊन आता थोडे तरी चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले आहे, यातच धन्यता वाटते आहे. वेल, आता पाहूयात चित्रपट रसिकांच्या भेटीला केव्हा येतो आणि त्याला कसा प्रतिसाद मिळतोय ते!
![katrina and ranbir]()