रणबीर-कॅटरिनामध्ये झाले ‘आॅल इज वेल’ !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2016 13:38 IST2016-07-28T08:08:26+5:302016-07-28T13:38:26+5:30

 ‘जग्गा जासूस’ या अनुराग कश्यप दिग्दर्शित चित्रपटाची शूटींग शेवटच्या टप्प्यात असून आता रणबीर-कॅटरिना कैफ यांच्यामध्ये आता सर्व ‘आॅल इज ...

Ranbir-Katrina got 'All Is Well'! | रणबीर-कॅटरिनामध्ये झाले ‘आॅल इज वेल’ !

रणबीर-कॅटरिनामध्ये झाले ‘आॅल इज वेल’ !

 
जग्गा जासूस’ या अनुराग कश्यप दिग्दर्शित चित्रपटाची शूटींग शेवटच्या टप्प्यात असून आता रणबीर-कॅटरिना कैफ यांच्यामध्ये आता सर्व ‘आॅल इज वेल’ झाल्याचे कळते आहे. जेव्हापासून जग्गा जासूसची शूटींग सुरू झाली आहे. तेव्हापासून त्यांच्यातील ब्रेकअपमुळे शूटींगमध्ये अडथळा येत आहे.

अनुराग बासु यांना रणबीर-कॅटरिना यांना एकत्र आणून शूटींग करून घ्यावी लागत होती. त्यामुळे त्याला शूटींगसाठी फार वेळ लागायचा. त्यांचा मूड आणि ठिकाणं यांच्यामुळे चित्रीकरणाला उशीर होत गेला. पण, सिद्धार्थ रॉय कपूर यांनी या बातमीला खोटे ठरवले आहे.

ते म्हणतात,‘असे काहीही नाही. जग्गा जासूसची शूटींग सध्या व्यवस्थित सुरू आहे. रणबीर-कॅटरिना हे प्रोफेशनल्स म्हणून एकमेकांसोबत काम करत आहेत. शूटींगही व्यवस्थित सुरू आहे. अशा अफवा खुप असतात पण, काहींकडे दुर्लक्ष केलेलेच बरे.’ 

Web Title: Ranbir-Katrina got 'All Is Well'!