हातात शस्त्र घेऊन रणबीर कपूर चालला कुठे ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2018 14:48 IST2018-02-20T09:18:13+5:302018-02-20T14:48:13+5:30

काही दिवसांपासून अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर त्यांचा आगामी चित्रपट 'ब्रह्मास्त्र'ला घेऊन चर्चेत राहिले आहेत. काही दिवसांपूर्वी ...

Ranbir Kapoor walked in arms with his arms? | हातात शस्त्र घेऊन रणबीर कपूर चालला कुठे ?

हातात शस्त्र घेऊन रणबीर कपूर चालला कुठे ?

ही दिवसांपासून अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर त्यांचा आगामी चित्रपट 'ब्रह्मास्त्र'ला घेऊन चर्चेत राहिले आहेत. काही दिवसांपूर्वी रणबीर आणि आलियाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते आता ह्या चित्रपटाशी संबंधित आणखीन एक  फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ह्या फोटोमध्ये रणबीर कपूर हातात शस्त्र घेऊन दिसतो आहे. रणबीरने  एक धारेधार शस्त्र आपल्या खांद्यावर घेतले आहे. या फोटोत रणबीर बरोबर त्याचे ट्रेनर सुद्धा पोज देताना दिसतो आहे आणि त्यांच्या हातात सुद्धा शस्त्र आहेत. हा चित्रपट अॅक्शनपट असून ह्यात आलिया आणि रणबीर भरपूर अॅक्शन करताना दिसणार आहेत.आयन मुखर्जी दिग्दर्शित हा चित्रपट प्राचीन इतिहासतील गोष्टीवर आधारित आहे. या चित्रपटाचे शूटिंग सध्या  बल्गेरियामध्ये सुरू आहे.

आलिया आणि रणबीर या चित्रपटासाठी इस्राईलला जाऊन आले तिथे जाऊन त्यांनी ह्या चित्रपटाचा अभ्यास त्यांनी केला. 'ब्रह्मास्त्र' हा चित्रपट विज्ञानवर आधारित आहे. ज्यात रणबीर एका सुपरहिरोची भूमिका साकारताना दिसणार आहे. यात आलिया, रणबीरसह अमिताभ बच्चन आणमि मौनी रॉयची मुख्य भूमिका आहे.  हा चित्रपट तीन भागांमध्ये रिलीज करण्यात येणार आहे.  याचा पहिला भाग  १५ ऑगस्ट २०१९ ला रिलीज केला जाणार आहे.

ALSO READ :   रणबीर कपूरच्या अफेअर्समुळे वैतागले ऋषी कपूर! विचारला असा बेधडक सवाल!!

लवकरच रणबीर कपूर संजय दत्तच्या बायोपिकमध्ये झळकणार आहे. 'संजू’ या नावाने हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार असल्याचे निश्चित झाले आहे. चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर संजूबाबाची भूमिका साकारणार आहे. त्याव्यतिरिक्त विक्की कौशल, सोनम कपूर, दिया मिर्झा, मनीषा कोइराला आणि अनुष्का शर्मा यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. चित्रपट २९ जून २०१८ मध्ये प्रदर्शित केला जाईल.

Web Title: Ranbir Kapoor walked in arms with his arms?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.