चित्रपटाचं नाव 'अ‍ॅनिमल' का ठेवलं? रणबीर कपूरने सांगितलं खास कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2023 19:56 IST2023-11-26T19:55:08+5:302023-11-26T19:56:54+5:30

'अ‍ॅनिमल' नाव देण्यामागे एक खास कारण आहे. याबद्दल रणबीर कपूरने एका मुलाखतीत खुलासा केला आहे.

Ranbir Kapoor unveils intriguing reason behind 'Animal' Title | चित्रपटाचं नाव 'अ‍ॅनिमल' का ठेवलं? रणबीर कपूरने सांगितलं खास कारण

चित्रपटाचं नाव 'अ‍ॅनिमल' का ठेवलं? रणबीर कपूरने सांगितलं खास कारण

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा 'अ‍ॅनिमल' चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. भरपूर ॲक्शनने भरलेल्या सिनेमातील गाणीही सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहेत. भारताबरोबर परदेशातही या चित्रपटाची क्रेझ बघायला मिळत आहे. या चित्रपटाला 'अ‍ॅनिमल' नाव देण्यामागे एक खास कारण आहे. याबद्दल रणबीर कपूरने एका मुलाखतीत खुलासा केला आहे.

'अ‍ॅनिमल' सिनेमीची टीम नुकतीच चेन्नईमध्ये एका कार्यक्रमात सहभागी झाली होती. कार्यक्रमादरम्यान  रणबीरला चित्रपटाचे नाव 'अ‍ॅनिमल' ठेवण्यामागचे कारण विचारण्यात आले. यावर तो म्हणाला, 'अ‍ॅनिमल ठेवण्याचे खास कारण म्हणजे, प्राणी हे अंतःप्रेरणेने वागतात. मी साकारत असलेले पात्र हे आपल्या कुटुबांचे रक्षण करण्यासाठी अंतःप्रेरणेने वागतो. तो आवेगपूर्ण आहे. तुम्ही एकदा हा चित्रपट बघितला की तुम्हाला हे नाव का ठेवले, ते कारण समजून जाईल'.

 'अ‍ॅनिमल' हा या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. दिग्दर्शन संदीप रेड्डी वांगा यांनी केले आहे.  रणबीर आणि रश्मिकासह या चित्रपटात बॉबी देओल, अनिल कपूर, तृप्ती डिमरी आणि शक्ती कपूर यांच्याही भूमिका आहेत. हा सिनेमा 1 डिसेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम अशा 5 भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. 


 

Web Title: Ranbir Kapoor unveils intriguing reason behind 'Animal' Title