पित्याच्या निधनानंतर आईला एकटीला सोडून रणबीर कपूर आलियासोबत! खवळले नेटीजन्स!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2020 13:19 IST2020-05-17T12:33:19+5:302020-05-17T13:19:55+5:30
. ऋषी कपूर यांच्या निधनाच्या धक्क्यातून चाहते अद्यापही सावरलेले नाहीत. अशात नीतू सिंग यांच्या मनाची काय अवस्था असेल याची कल्पना तुम्ही आम्ही करू शकतो. पण रणबीरचे काय?

पित्याच्या निधनानंतर आईला एकटीला सोडून रणबीर कपूर आलियासोबत! खवळले नेटीजन्स!!
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर याचे डॅड अर्थात ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे नुकतेच निधन झाले. ऋषी कपूर यांच्या निधनाच्या धक्क्यातून चाहते अद्यापही सावरलेले नाहीत. अशात नीतू सिंग यांच्या मनाची काय अवस्था असेल याची कल्पना तुम्ही आम्ही करू शकतो. पण रणबीरचे काय? रणबीर सध्या सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होतोय. याचे कारण म्हणजे, पित्याच्या मृत्यूला काही दिवस होत नाही तोच रणबीर आईला सोडून वेगळ्या घरात राहायला गेलाय.
लोकांना ही गोष्ट खटकली आणि त्यांनी रणबीरला ट्रोल करणे सुरु केले. यावेळी नीतूंना रणबीरच्या आधाराची गरज आहे. त्याने आईसोबत राहायला हवे. पण रणबीर मात्र गर्लफ्रेन्ड आलिया भट हिच्यासोबत राहतोय़ नुकतीच ऋषी कपूर यांच्या तेरवीचा कार्यक्रम झाला. यावेळी रणबीर व आलिया दोघेही एकाच गाडीतून या कार्यक्रमाला आले होते. या कार्यक्रमानंतर रणबीर पुन्हा आलियासोबत निघून गेला. यावेळी आईला गरज असताना रणबीर काही दिवस तिच्यासोबत राहू शकत नाही का? असा सवाल युजर्स करत आहेत. अद्याप रणबीर यावर काहीही बोललेना नाही़ यावर तो काय खुलासा करतो ते बघूच.
बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर गत दोन वर्षांपासून कॅन्सरला झुंज देत होते. या काळात कधीही त्यांनी आपल्या आजाराचा उल्लेख केला नाही. हसत हसत सकारात्मकपणे ते या आजाराला सामोरे गेले.
मृत्यूच्या काही तास आधीही रूग्णालयातील स्टाफसोबत त्यांनी हसत हसत वेळ घालवला होता. 30 एप्रिलला वयाच्या 67 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
‘शर्माजी नमकीन’ त्यांचा अखेरचा सिनेमा होता. मात्र हा चित्रपट पूर्ण होण्याआधीच त्यांनी जगाचा निरोप घेतला.