Ranbir Kapoor : "हो, मी सहन करतोय, आलिया बेडवर..."; रणबीर कपूरने सांगितलं 'ते' बेडरूम सीक्रेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2023 15:01 IST2023-06-11T14:39:35+5:302023-06-11T15:01:00+5:30
Ranbir Kapoor And Alia Bhatt : रणबीर-आलियाही एकमेकांवर खूप प्रेम करतात. याच दरम्यान, आता रणबीर कपूरने आलियाबाबत खुलासा केला आहे.

Ranbir Kapoor : "हो, मी सहन करतोय, आलिया बेडवर..."; रणबीर कपूरने सांगितलं 'ते' बेडरूम सीक्रेट
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे बॉलिवूडमधील मोस्ट एडोरेबल कपलपैकी एक कपल आहे. दोघेही लग्नानंतर लगेचच पालक झाले आणि आता मुलगी राहासोबत पालकत्वाचा आनंद घेत आहेत. दोघांची जोडी चाहत्यांना फार आवडते. रणबीर-आलियाही एकमेकांवर खूप प्रेम करतात. याच दरम्यान, आता रणबीर कपूरने आलियाबाबत खुलासा केला आहे. त्याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, "आलिया बेडरूममध्ये अशा प्रकारे झोपते की ज्यामुळे मी अस्वस्थ होतो"
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट सध्या रामायण चित्रपटात राम आणि सीतेच्या भूमिकेमुळे चर्चेत आहेत. याच दरम्यान, बॉलीवूड डबलला दिलेल्या एका मुलाखतीत त्याने आलियाच्या झोपण्याच्या वाईट सवयीबद्दल सांगितले आणि आलियाला नीट झोप न लागल्याने त्याला कशाप्रकारे काळजी घ्यावी लागते हे सांगितले.
रणबीर म्हणाला, 'जेव्हा आलिया झोपते तेव्हा त्यांचा बेड लहान होऊ लागतो. तिचं डोकं कुठेतरी, हात कुठेतरी आणि पाय कुठेतरी. अशा प्रकारे मी पलंगाच्या एका कोपऱ्यात पोहोचतो. त्यानंतर आलियाने या प्रकरणावर 'तू हे सहन करतोस? असा प्रश्न विचारला. त्यावर रणबीर म्हणाला, 'हो मी सहन करत आहे.'
आलिया भट्टची वेळ आली तेव्हा तिने रणबीर कपूरच्या एका सवयीबद्दल सांगितले, ज्यामुळे ती खूप त्रस्त झाली. आलिया म्हणाली, "मी जी वाईट सवय सहन करतेय ती म्हणजे शांत राहणे, जेव्हा मी त्याला काही विचारते तेव्हा तो गप्प राहतो. कधीकधी मी त्याला हलवून हलवून विचारते तरीही तो उत्तर देत नाही." एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.