"वडील कधीच माझे मित्र झाले नाहीत, आता राहासोबत...", रणबीर कपूरचं लेकीसोबतच्या नात्यावर भाष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 09:16 IST2026-02-11T09:15:18+5:302026-02-11T09:16:12+5:30

वडील माझ्यासोबत जसे होतो तसं मी राहासोबत वागणार नाही...रणबीर असं काय म्हणाला?

ranbir kapoor says he never been friends with his father rishi kapoor now he wont repeat it with daughter raha | "वडील कधीच माझे मित्र झाले नाहीत, आता राहासोबत...", रणबीर कपूरचं लेकीसोबतच्या नात्यावर भाष्य

"वडील कधीच माझे मित्र झाले नाहीत, आता राहासोबत...", रणबीर कपूरचं लेकीसोबतच्या नात्यावर भाष्य

अभिनेता रणबीर कपूर आणि लेक राहाचा बॉन्ड सर्वांनीच पाहिला आहे. राहाच्या जन्मानंतर रणबीर खूपच बदलला आहे. लेकीसोबत असताना तो जास्त आनंदी दिसतो. राहा सुद्धा वडिलांसोबत असताना एकदम मस्ती मूडमध्ये असते. नुकतंच रणबीरने लेकीसोबतचं नातं कसं हवं आहे यावर भाष्य केलं. वडील ऋषी कपूर यांचा रणबीरच्या मनात कायम धाक होता. तो कायम त्यांच्या पासून दूरच असायचा, पण हेच राहासोबत होऊ देणार नाही असं रणबीर म्हणाला.

मुंबईतील एका ज्वेलरी ब्रँडच्याॉ इव्हेंटमध्ये रणबीर कपूरने हजेरी लावली. यावेळी तो म्हणाला, "मी आणि माझे वडील आमच्यात कायम अंतर असायचं. आमच्यात कधी मैत्री नव्हती. ती पिढीच तशी होती. पण माझ्या मुलांसोबत असताना मला ती भिंत तोडायची आहे. मला माझ्या मुलीचा मित्र व्हायचं आहे. तिच्या पंखांना बळ द्यायचं आहे जेणेकरुन ती तिला हवं ते करु शकेल."

कपूर कुटुंबातला मुलगा असल्याचा कधी दबाव होता का? यावर रणबीर म्हणाला, "मला कधीच दबाव वाटला नाही. ही जबाबदारी मला वारश्यानेच मिळाली. हजारो, लाखो टॅलेंटेड कलाकार आपल्याकडे असतील जे एका संधीची वाट पाहत आहेत आणि मला ही संधी सहज मिळाली त्यामुळे मी याला गृहित धरु शकत नाही. मला खूप मेहनत करावी लागेल. मला ओरिजनल व्हावं लागेल, स्वत:ला सिद्ध करावं लागेल."

रणबीर आणि आलियाची लेक राहा आता तीन वर्षांची आहे. राहा पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर आली तेव्हा ती अगदी आजोबांसारखीच दिसते अशी अनेकांना प्रतिक्रिया दिली होती. राहाचे अनेक फोटो नंतर सोशल मीडियावर व्हायरल झाले. मात्र आता सुरक्षेच्या कारणास्तव राहाचा चेहरा लपवला जातो त्यामुळे चाहत्यांची निराशा होत आहे.

Web Title : रणबीर कपूर अपनी बेटी राहा के दोस्त बनना चाहते हैं।

Web Summary : रणबीर कपूर ने अपने दिवंगत पिता, ऋषि कपूर के साथ अपने रिश्ते पर विचार किया और अपनी बेटी राहा के लिए एक दोस्त और समर्थन प्रणाली बनने की इच्छा व्यक्त की, जैसा कि उनका अपना अनुभव था। वह उसके सपनों को सशक्त बनाना चाहते हैं।

Web Title : Ranbir Kapoor wants to be a friend to his daughter Raha.

Web Summary : Ranbir Kapoor reflects on his relationship with his late father, Rishi Kapoor, and expresses his desire to be a friend and support system for his daughter, Raha, unlike his own experience. He wants to empower her dreams.