रणबीर कपूरला मिळाली आलियाची साथ, Animal मध्ये काम करताना केली मोठी मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2023 16:42 IST2023-11-29T16:41:15+5:302023-11-29T16:42:49+5:30

सिनेमातील रणबीरचा अवतार अंगावर शहारे आणणारा आहे.

Ranbir Kapoor says Alia helped him when he was scared to shoot intense scenes in Animal movie | रणबीर कपूरला मिळाली आलियाची साथ, Animal मध्ये काम करताना केली मोठी मदत

रणबीर कपूरला मिळाली आलियाची साथ, Animal मध्ये काम करताना केली मोठी मदत

अभिनेता रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) मोठा चाहतावर्ग आहे. संदीप रेड्डी वांगाच्या 'अॅनिमल'(Animal) सिनेमामुळे सध्या तो चर्चेत आहे. यामध्ये त्याने अनेक इंटेन्स सीन दिले आहेत. सिनेमातील रणबीरचा अवतार अंगावर शहारे आणणारा आहे. हिंसा, रक्तपात अशी एकंदर सिनेमाची व्हाईब आहे. रणबीरने अनेक सीन्स शूट करण्यासाठी पत्नी आलियाची (Alia Bhatt) मदत घेतल्याचा नुकताच खुलासा केला.

अॅनिमल प्रमोशनच्या वेळी रणबीर म्हणाला, 'मी आर्टिस्ट म्हणून आलियाचा आदर करतोय. ती ज्याप्रकारे गोष्टींचा विचार करते त्याचाही मला आदर आहे. प्रत्येक सीन शूट करण्याच्या आधी मी आलियासोबत चर्चा करायचो. तिने अनेक सीन्ससाठी माझी मदत केली आहे. मला जे सीन्स करण्यापूर्वी भीती वाटायची, आत्मविश्वास वाटायचा नाही तिथे आलिया मला मदत करायची.'

तो पुढे म्हणाला,'मी कधीच माझी भूमिका पूश करण्याचा प्रयत्न केला नाही. मी नेहमीच स्क्रीनवर चांगल्या व्हाईब देणाऱ्या भूमिका केल्या. पण आलियाने मला माझ्या मर्यादा क्रॉस करण्यासाठी मदत केली. ती म्हणाली ही फक्त एक भूमिका आहे आणि हा सीन आहे. जे सीन तयार करत आहेत यामागे बऱ्याच कल्पना आहेत.  आलिया नेहमीच माझी सपोर्ट सिस्टीम राहिली आहे.'

अॅनिमल १ डिसेंबर रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होतोय. सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला तुफान प्रतिसाद मिळतोय.अॅडव्हान्स बुकिंगमध्येच सिनेमाने १४ कोटींचा व्यवसाय केला आहे.

Web Title: Ranbir Kapoor says Alia helped him when he was scared to shoot intense scenes in Animal movie