पहले भी मै! रणबीर कपूरचा तृप्ती डिमरीसोबत रोमँटिक डान्स, आलिया भटसमोरच केला रोमान्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2024 12:56 IST2024-01-29T12:55:54+5:302024-01-29T12:56:41+5:30

Animal सिनेमात रणबीर कपूर आणि तृप्ती डिमरी यांच्या इंटिमेट सीन्सची जोरदार चर्चा झाली होती.

Ranbir Kapoor romantic dance performance with Tripti Dimri at Filmfare Awards night | पहले भी मै! रणबीर कपूरचा तृप्ती डिमरीसोबत रोमँटिक डान्स, आलिया भटसमोरच केला रोमान्स

पहले भी मै! रणबीर कपूरचा तृप्ती डिमरीसोबत रोमँटिक डान्स, आलिया भटसमोरच केला रोमान्स

Filmfare Awards 2024: गुजरात येथे काल रात्री हिंदी सिनेमातील प्रतिष्ठित फिल्मफेअर पुरस्कार सोहळा पार पडला. सेलिब्रिटींच्या डान्स परफॉर्मन्सने या सोहळ्यात रंगत आणली. तर करण जोहर आणि आयुष्यमान खुरानाने सूत्रसंचालनातून धमाल केली. यंदाचा फिल्मफेअर पुरस्कार अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भटला (Alia Bhat) मिळाला. रिअल लाईफ जोडीने फिल्मफेअर पुरस्कारावर नाव कोरले. दरम्यान रणबीरनेही Animal सिनेमातील गाण्यांवर दमदार डान्स परफॉर्मन्स सादर केला. आलिया समोर स्टेजवर रणबीर आणि तृप्ति डिमरीनेही (Tripti Dimri) रोमँटिक परफॉर्मन्स दिला. 

Animal सिनेमात रणबीर कपूर आणि तृप्ती डिमरी यांच्या इंटिमेट सीन्सची जोरदार चर्चा झाली होती. कालच्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात रणबीरने तृप्तीसोबत स्टेजवर डान्स केला. त्यांचं गाजलेलं 'पहले भी मै' गाण्यावर त्यांनी डान्स केला. तर समोर आलिया भटही बसली होती. सिनेमानंतर तृप्ती डिमरी 'भाभी 2' म्हणूनही चर्चेत आली होती. तृप्तीने शॉर्ट लाल रंगाचा ड्रेस घातला होता. तर रणबीर ब्लॅक आऊटफिटमध्ये दिसला. रणबीरने तृप्तीला उचलूनही घेतलं तेव्हा सर्वांनी एकच जल्लोष केला. त्यांचा डान्स परफॉर्मन्स सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

सोशल मीडियावर दोघांच्या डान्स परफॉर्मन्सवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. 'तृप्तीला डान्स करता येत नाही' अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. तर काहींनी तिच्या आऊटफिटवरही टीका केली आहे.'स्कूल फंक्शनचा कॉस्च्युम घेऊन आल्यासारखं वाटतंय' अशी कमेंट एकाने केली आहे. 

Animal या सुपरहिट सिनेमाचा सीक्वल Animal Park ही येणार आहे. यामध्ये तृप्तीला जास्त स्क्रीनटाईम असेल. तसंच तृप्ती आणि रणबीर आणखी केमिस्ट्री यामध्ये पाहायला मिळेल. Animal पेक्षा त्याचा सीक्वल आणखी खतरनाक असणार अशी हिंट मेकर्सने याआधीच दिली आहे.

Web Title: Ranbir Kapoor romantic dance performance with Tripti Dimri at Filmfare Awards night