रणबीर कपूरने आलियाला घातलेत 'हे' निर्बंध, "लिपस्टिक लावण्यावरुनही..."; नेटकऱ्यांनी केलं सावध
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2023 17:09 IST2023-08-16T17:08:50+5:302023-08-16T17:09:52+5:30
नेटकऱ्यांनी आलियाला एकप्रकारे सावधच केले आहे.

रणबीर कपूरने आलियाला घातलेत 'हे' निर्बंध, "लिपस्टिक लावण्यावरुनही..."; नेटकऱ्यांनी केलं सावध
बॉलिवूडमध्येरणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट (Alia Bhat) हे पॉवर कपल आहे. त्यांची जोडीचे अनेक चाहते आहेत. आलिया अगदी १३ वर्षांची असल्यापासूनच रणबीर कपूरची चाहती आहे. हे तिने अनेकदा मुलाखतींमध्ये बोलून दाखवलं आहे. रणबीरशी लग्न करण्याची तिची इच्छा होती आणि तिची ही इच्छा खरंच पूर्णही झाली. आलिया अनेकदा मुलाखतींमध्ये नवऱ्याचे गुणगान गात असते. त्याच्याबद्दल बोलत असते. मात्र ती अशा काही गोष्टींचा खुलासा करते ज्यामुळे तिला आणि रणबीरला चांगलंच ट्रोल केलं जातं. नुकतंच आलियाने पुन्हा असाच काहीसा खुलासा केला आहे.
'व्होग इंडिया'ने त्यांच्या इन्स्टाग्रामवर आलियाचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये आलिया काही मेकअप टीप्स देताना दिसते. दरम्यान आलियाची लिपस्टिक लावण्याची पद्धत खूपच वेगळी आहे. लिपस्टिक ओठांवर न फिरवता ती ओठांची हालचाल करत लिपस्टिक लावते. अशी तिची विचित्र पद्धत तिने व्हिडिओतून दाखवली आहे. यावेळी ती असंही बोलते की, माझा मवरा रणबीर म्हणजे तेव्हाचा बॉयफ्रेंड त्याला माझं लिपस्टिक लावणं आवडत नाही. मी लिपस्टिक लावून गेले की तो ते काढायला लावतो. त्याला माझ्या ओठांचा नैसर्गिक रंगच आवडतो असं ती म्हणते. तिच्या याच वाक्यावर नेटकऱ्यांनी तिची शाळाच घेतली आहे.
'तुझा नवरा तुझ्यासाठी रेड फ्लॅग आहे','तुमचा नवरा जर तुम्हाला असं करायला सांगतोय तर तुम्ही तिथून पळाला पाहिजे ती एक मोठी साईन आहे', 'बरं झालं दीपिका आणि कॅटरिना सुटल्या' अशा कमेंट्स आलियाच्या या व्हिडिओवर आल्या आहेत. आलियाने याआधीही अनेकदा रणबीर कशाप्रकारे निर्बंध घालतो याबद्दल कळत नकळत सांगितलं आहे. त्यावरुन नेटकऱ्यांनी तिला एकप्रकारे सावधच केले आहे.