रनबीर कपूरला मिळाल्या २ बायोपिकच्या आॅफर्स; ध्यानचंद, युवराज सिंगची भूमिला साकारणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2017 21:56 IST2017-02-05T15:43:09+5:302017-02-05T21:56:05+5:30

बॉलिवूड अभिनेता रनबीर कपूर सध्या राजकुमार हिरानी दिग्दर्शित संजय दत्तच्या बायोपिक ची शूटिंग करीत आहे. या चित्रपटातून रनबीरच्या अभिनयाचे ...

Ranbir Kapoor received 2 biopic awards; Dhyanchand, Yuvraj Singh to fulfill his land? | रनबीर कपूरला मिळाल्या २ बायोपिकच्या आॅफर्स; ध्यानचंद, युवराज सिंगची भूमिला साकारणार?

रनबीर कपूरला मिळाल्या २ बायोपिकच्या आॅफर्स; ध्यानचंद, युवराज सिंगची भूमिला साकारणार?

लिवूड अभिनेता रनबीर कपूर सध्या राजकुमार हिरानी दिग्दर्शित संजय दत्तच्या बायोपिक ची शूटिंग करीत आहे. या चित्रपटातून रनबीरच्या अभिनयाचे नवे पैलू समोर येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र याच दरम्यान त्याला दोन खेळाडूंच्या बायोपिकमध्ये अभिनयाच्या आॅफर मिळाल्या असल्याचे सांगण्यात येत आहे. भारतीय क्रिकेट संघाचा ‘कमबॅक मॅन’ युवराज सिंग व हॉकीचे जादुगर ध्यानचंद यांच्या जीवनावर आधारीत चित्रपट त्याने भूमिका करावी यासाठी निर्माते प्रयत्न करीत आहेत. 

रनबीर कपूरच्या कॅम्पने या बातमीला दुजोरा दिला असून, त्याला दोन खेळाडूंच्या जीवनावर आधारित बायोपिकच्या आॅफर मिळाल्या आहेत. मात्र याबद्दल अद्याप काहीच ठरले नसून या भविष्यातील योजना असल्याचे सांगण्यात आले आहे. स्पोटर्स्कि डा या संकेतस्थळाने दिलेल्या बातमीनुसार, निर्मात्या भगिणी पूजा शेट्टी व आरती शेट्टी यांनी अशोक ध्यानचंद यांच्याकडून ध्यानचंद यांच्या चित्रपटासाठीचे अधिकार विकत घेतले आहे. त्यांनी करण जोहरशी संपर्क साधला असून या चित्रपटाच्या निर्मितीसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनने यास दुजोरा दिला असला तरी तो अधिकृत नसल्याचे सांगितले आहे. ध्यानचंद हे ब्रिटीशकालीन भारतीय हॉकी संघात होते, त्यांना हॉकीचे जादुगर म्हणूनही ओळखले जाते. 



युवराज सिंग याच्यावर आधारित चित्रपटासंबधी अधिकृत माहिती हाती आली नसली तरी देखील कर्करोगाशी लढा दिल्यानंतर त्याने भारतीय क्रिकेट संघात केलेले पुनरागम साकारण्यासाठी वरुण धवन व शाहरुख खान उत्सुक असल्याचे सांगण्यात येते. मात्र सध्यातरी ही केवळ चर्चा आहे. मात्र युवराज सिंगच्या जीवनात आलेले चढ उतार चित्रपटासाठी सर्वोत्तम असल्याचे मानले जात आहे. 



मागील वर्षी तब्बल १३ बायोपिक रिलीज झाले. इमरान हाशमी याची भूमिक ा असलेला अझहर, सुशांत सिंग राजपूतचा एम.एस. धोनी : अनटोल्ड स्टोरी व आमिर खानचा दंगल हे तीन चित्रपट खेळाडूच्या जीवनावर आधारित होते. यापैकी अझहर वगळता दोन्ही चित्रपट बॉक्स आॅफिसवर यशस्वी ठरले होते. दरम्यान दिग्दर्शक रिमा कागती ‘गोल्ड’ या चित्रपटाची निर्मिती करीत असून यात अक्षय कुमार हॉकी स्टार बलबीर सिंगची भमिका साकारणार आहे. हा चित्रपट १९४८ साली स्वतंत्र भारताने मिळविलेल्या पहिल्या गोल्डमेडलवर आधारित असेल. 

Web Title: Ranbir Kapoor received 2 biopic awards; Dhyanchand, Yuvraj Singh to fulfill his land?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.