रणबीर कपूर नाही तर रणवीर सिंग उतरला मैदानात! माहिरा खानचा असा केला बचाव!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2017 13:26 IST2017-11-06T07:56:40+5:302017-11-06T13:26:40+5:30

अभिनेता रणबीर कपूर आणि पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान यांचे सिगरेट ओढत असतानाचे फोटो व्हायरल झालेत आणि यावरून व्हायचा तो ...

Ranbir Kapoor, Ranveer Singh landed on the ground! Mahira Khan has done such a rescue! | रणबीर कपूर नाही तर रणवीर सिंग उतरला मैदानात! माहिरा खानचा असा केला बचाव!!

रणबीर कपूर नाही तर रणवीर सिंग उतरला मैदानात! माहिरा खानचा असा केला बचाव!!

िनेता रणबीर कपूर आणि पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान यांचे सिगरेट ओढत असतानाचे फोटो व्हायरल झालेत आणि यावरून व्हायचा तो बोभाटाही झाला. पाकिस्तानींचा राग तर या फोटोंमुळे चांगलाच अनावर झाला. माहिरा खान, आता पाकिस्तानात परत येऊ नकोस, अशी चिथावणी या फोटोंनंतर माहिराला मिळाली. काहींनी तर तिला ‘शर्म से मर जाओ, पाकिस्तान से दफा हो जाओ. शॉर्ट ड्रेस उपर सिगरेट. तुम जैसी पाकी कलाकार पाकिस्तान को बदनाम करते है,’अशा अर्वाच्य शब्दांत सुनावले. या  फोटोंमध्ये रणबीर कपूर व माहिरा खान दोघेही स्मोकिंग करताना दिसले होते. माहिरा यात एका शॉर्ट  बॅकलेस ड्रेसमध्ये होती. शिवाय तिच्या शरिरावर काही ‘लव्ह बाईट्स’ही कॅमे-याने टिपले होते. 



अलीकडे माहिरा या संपूर्ण प्रकरणावर बोलताना दिसली होती. मला असल्या टीकेमुळे फार फरक पडत नाही, असे तिने सुनावले होते. पण रणबीर मात्र या संपूर्ण प्रकरणावर ब-यापैकी शांत राहिला. अजूनही तो शांतच आहे. रणबीर या प्रकरणावर बोलणे अपेक्षित असताना आताश: त्याच्याऐवजी एक दुसराच बॉलिवूड अभिनेता या कॉन्टोव्हर्सीवर बोललायं. हा अभिनेता कोण? तर रणवीर सिंग. होय, अलीकडे एका मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत रणवीर सिंग या संपूर्ण एपिसोडवर बेधडक बोलला. ‘तुम्ही एखाद्या खास व्यक्तीसोबत खास क्षण घालवत असताना काही लोक त्यात विनाकारण नाक खुपसतात. अशावेळी खूप काही करावेसे वाटत असूनही तुम्ही काहीही करू शकत नाही. कारण हे जग वेडे आहे. प्रत्येकाचे संस्कार, आचार-विचार आणि आयुष्य जगण्याची पद्धत भिन्न आहे. तुम्हाला दुसºयाला काहीही शिकवण्याचा अधिकार नाही. माहिरा एक गुणी अभिनेत्री आहे. लोकांनी केवळ कलाकाराची कला पाहावी. दुसºयाचा खासगी आयुष्याचा ठेका घेणे सोडून घ्यावे. माझ्यामते, या जगात आयुष्य जगताना चांगल्यासोबत काही वाईटही वाट्याला येणार. माझे स्वत:चे सांगायचे तर मला जे वाटते, जे आवडते, तेच मी करतो. मी खूप पैसा कमावलायं. पण काही गोष्टी मलाही छळतात. हे वेड्यांचे जग आहे,’असे रणवीर म्हणाला.

ALSO READ: SEE PICS : कॅमे-यात कैद झाली रणबीर कपूरची नवी गर्लफ्रेन्ड! ‘इंटिमेट’ फोटो व्हायरल!!
 

Web Title: Ranbir Kapoor, Ranveer Singh landed on the ground! Mahira Khan has done such a rescue!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.