'ब्रह्मास्त्र'मध्ये डीजेची भूमिका साकारणार रणबीर कपूर ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2019 15:45 IST2019-04-20T15:35:20+5:302019-04-20T15:45:15+5:30
रणबीर कपूर आणि आलिया भटच्या 'ब्रह्मास्त्र' सिनेमाची वाट त्यांचे फॅन्स मोठ्या आतुरतेने पाहता येत. आयन मुखर्जी या सिनेमाचे दिग्दर्शन करतोय.

'ब्रह्मास्त्र'मध्ये डीजेची भूमिका साकारणार रणबीर कपूर ?
ठळक मुद्दे रणबीर कपूर यात डीजेची भूमिका साकारणार आहे'ब्रह्मास्त्र' सिनेमासाठी रणबीरने मार्शल आर्टची ट्रेनिंग घेतली आहे
रणबीर कपूर आणि आलिया भटच्या 'ब्रह्मास्त्र' सिनेमाची वाट त्यांचे फॅन्स मोठ्या आतुरतेने पाहता येत. आयन मुखर्जी या सिनेमाचे दिग्दर्शन करतोय. रिपोर्टनुसार रणबीर कपूर यात डीजेची भूमिका साकारणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार रणबीर कपूर असा डीजेची भूमिका साकारणार आहे जो वडिलांच्या मर्जीच्या विरुद्ध घर सोडून बाहेर पडता आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी. 'ब्रह्मास्त्र' सिनेमासाठी रणबीरने मार्शल आर्टची ट्रेनिंग घेतली आहे. यात तो दमदार अॅक्शन करताना दिसणार आहे.
'ब्रह्मास्त्र' सिनेमाच्या निमित्ताने ही जोडी पहिल्यांदा पडद्यावर एकत्र दिसणार आहे. (‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानच दोघांच्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. सोनम कपूरच्या लग्नात या दोघांना एकत्र पाहिले गेले आणि तिथूनच त्यांच्या अफेअरविषयी चर्चा सुरू झाल्या. )‘ब्रह्मास्त्र’ या सिनेमात रणबीर कपूरसोबत आलिया भट्ट, महानायक अमिताभ बच्चन,मौनी राय आणि साऊथ सुपरस्टार नागार्जुन मुख्य भूमिकेत आहेत.
करिअरच्या सुरूवातीला रणबीरने रोमॅन्टिक सिनेमात केलेत. या सिनेमाने त्याची लव्हरबॉय ही इमेज तयार केली. पण आता तो या इमेजमधून बाहेर पडण्यासाठी स्वत:हून प्रयत्न करतो आहे. कदाचित म्हणूनचं रणबीरने ‘ब्रह्मास्त्र’ सारखासिनेमा साईन केला आहे.