...तर अशी होती रणबीर कपूरची पहिली डेट, तरूणीच्या प्रश्नाला उत्तर देत केला खुलासा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2020 10:41 IST2020-11-27T10:37:56+5:302020-11-27T10:41:40+5:30

लाखों तरूणींच्या मनावर राज्य करणाऱ्या रणबीर कपूरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ अभिनेत्याच्या फॅन पेजवर शेअर करण्यात आलाय.

Ranbir Kapoor opened up about his first date and revealed girl answer | ...तर अशी होती रणबीर कपूरची पहिली डेट, तरूणीच्या प्रश्नाला उत्तर देत केला खुलासा!

...तर अशी होती रणबीर कपूरची पहिली डेट, तरूणीच्या प्रश्नाला उत्तर देत केला खुलासा!

आपल्या जबरदस्त अभिनयाने बॉलिवूडमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण करणारा अभिनेता रणबीर कपूर सोशल मीडियापासून दूरच राहतो. मात्र, तो भलेही सोशल मीडियापासून दूर असला तरी त्याच्या नावाचे अनेक फॅन पेज आहेत.  या फॅन पेजवर नेहमीच रणबीर कपूरसंबंधी व्हिडीओज आणि फोटोज शेअर केले जातात. त्याचा एक लेटेस्ट व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

लाखों तरूणींच्या मनावर राज्य करणाऱ्या रणबीर कपूरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ अभिनेत्याच्या फॅन पेजवर शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओत तो त्याच्या पहिल्या डेटबाबत सांगत आहे.

'द कपिल शर्मा' शोमध्ये रणबीर कपूरला एका फॅनने त्याच्या पहिल्या डेटबाबत प्रश्न विचारला होता. त्यावर तो म्हणाला की, 'मी आठव्या वर्गात होतो आणि एका मित्राच्या बर्थडे पार्टीला गेलो होतो. तिथे एक मुलगी एका कोपऱ्यात रडत होती. मी तिच्याजवळ गेलो आणि विचारले की, तू का रडत आहेस. यावर ती मुलगी म्हणाली की, माझा तुझ्यावर विश्वास नाहीये'.

रणबीर कपूरने पुढे सांगितले की, 'मी त्या मुलीचं उत्तर ऐकून आश्चर्यचकित झालो आणि विचार केला की, तिचा विश्वास जिंकण्यासाठी काय करावं. यानंतर मी माझा हात तिच्या समोर केला आणि तिला म्हणालो की, आता तुझा माझ्यावर विश्वास आहे का? रणबीरने पुढे सांगितले की, ती मुलगी माझ्यासोबत कधीच डेटवर आली नाही.

दरम्यान, रणबीर कपूर सध्या अभिनेत्री आलिया भट्टसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. दोघे नेहमीच एकत्र दिसतात. दोघांच्या लग्नाच्याही चर्चा नेहमीच सुरू राहतात. इतकेच नाही तर दोघे पहिल्यांदाच अयान मुखर्जीच्या 'ब्रम्हास्त्र' मध्ये एकत्र दिसणार आहेत. 
 

Web Title: Ranbir Kapoor opened up about his first date and revealed girl answer