Ranbir-Alia Wedding: रणबीरने आलियाचा हात मागितल्यावर महेश भट यांची अशी झाली होती अवस्था, वाचा स्वविस्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2019 14:57 IST2019-08-13T14:56:55+5:302019-08-13T14:57:08+5:30
गेल्या अनेक दिवसांपासून रणबीर कपूर आणि आलिया भट यांच्या अफेअरची चर्चा आहे. जवळपास वर्षभरापासून हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत.

Ranbir-Alia Wedding: रणबीरने आलियाचा हात मागितल्यावर महेश भट यांची अशी झाली होती अवस्था, वाचा स्वविस्तर
गेल्या अनेक दिवसांपासून रणबीर कपूर आणि आलिया भट यांच्या अफेअरची चर्चा आहे. जवळपास वर्षभरापासून हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत. काही दिवस दोघांनीही आपले नाते जगापासून लपवून ठेवले. पण शेवटी ते जगजाहिर झालेच. एबीपी न्यूजच्या माहितीनुसार, लवकरच दोघे लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याची चर्चा आहे. पुढच्या वर्षी लग्न करणार असल्याची चर्चा आहे.
एबीपी न्यूजच्या रिपोर्टनुसार, रणबीरने आलियाचे वडील महेश भट यांची भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान रणबीरने महेश भट यांच्याकडे लग्नासाठी आलियाचा हात मागितला आहे. रणबीरने आलियाचा हात मागितल्यानंतर महेश भट हे काहीसे भावूक झाले होते.
काही दिवसांपूर्वी आलिया मुंबईतल्या प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जींच्या स्टोअर बाहेर दिसली. मिळालेल्या माहितीनुसार आलियाने लग्नासाठी लेहंग्याची ऑर्डर दिली. सप्टेंबर महिन्यात ऋषी कपूर न्यूयॉर्कवरुन मुंबईत परतणार आहेत. त्यानंतर आलिया आणि रणबीरच्या लग्नाची तारीख फायनल करण्यात येईल.
बाबत बोलायचे झाले ते, ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमाच्या निमित्ताने रणबीर व आलिया भट्ट पहिल्यांदा एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत. (‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानच दोघांच्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. ‘ब्रह्मास्त्र’मध्ये रणबीर आलियासह, महानायक अमिताभ बच्चन,मौनी राय आणि साऊथ सुपरस्टार नागार्जुन मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमात एक सुपरहिरोची कथा पाहायला मिळणार आहे.