रणबीर कपूरने १२ तर विकीने १५ किलो वजन घटवलं, काय आहे कारण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 17:55 IST2025-05-23T17:55:29+5:302025-05-23T17:55:52+5:30
रणबीर कपूर आणि विकी कौशल यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

रणबीर कपूरने १२ तर विकीने १५ किलो वजन घटवलं, काय आहे कारण?
काही कलाकार आपल्या वाट्याला आलेल्या व्यक्तिरेखेत जीव ओतण्यासाठी कोणत्याही प्रकारची मेहनत घ्यायला तयार असतात. सध्याचे आघाडीचे अभिनेते रणबीर कपूर आणि विकी कौशलही याला अपवाद नाहीत. दोघांनीही वेळोवेळी रुपेरी पडद्यावरील व्यक्तिरेखा सजीव करण्यासाठी कठोर परिश्रम घेतल्याचे पाहायला मिळाले आहे. सध्या दोघेही संजय लीला भन्साळी यांच्या 'लव्ह अँड वॅार' या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे.
'लव्ह अँड वॅार' या चित्रपटातील आपापल्या भुमिकेसाठी विकी आणि रणबीरनं शारीरिक परिवर्तन केलं आहे. न्यूज १८नुसार, रणबीरने १२ किलो, तर विकीने चक्क १५ किलो वजन घटवल्याची माहिती मिळाली आहे. दोन्ही स्टार्सचे हे जबरदस्त बॉडी ट्रान्सफॉर्मेशन प्रेक्षकांसाठी एक खास अनुभव असणार आहे.
'लव्ह अँड वॅार' चित्रपटात एक लव्ह स्टोरी पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे सुमारे २०० कोटी बजेट आहे. या चित्रपटात लव्ह ट्रँगल पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट २०२६ ला ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार असून बॉक्स ऑफिसवर देखील बंपर कमाई करेल, अशी निर्मात्यांना आशा आहे. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. कारण रणबीर, विकी आणि आलिया या अष्टपैलू कलाकारांना एकत्र पाहणं चाहत्यांसाठी पर्वणीच ठरणार आहे.
रणबीर-विकी आणि आलियाच्या वर्कफ्रंटबद्दल...
विकी कौशल शेवटचा 'छावा' चित्रपटात दिसला होता, जो २०२५ मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. दुसरीकडे, आलिया भट सध्या तिच्या आगामी 'अल्फा' चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. तर रणबीर कपूरचा 'रामायण' पुढील वर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन नितेश तिवारी करत आहेत.