४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 11:28 IST2025-08-02T11:27:32+5:302025-08-02T11:28:05+5:30

Ranbir Kapoor: रणबीर कपूर सध्या त्याच्या आगामी 'रामायण' चित्रपटामुळे चर्चेत आहे. नितेश तिवारी यांच्या दिग्दर्शनाखाली बनणाऱ्या या चित्रपटाचे बजेट ४००० कोटी रुपये आहे. या चित्रपटात रणबीर कपूर भगवान रामाच्या भूमिकेत दिसणार आहे.

Ranbir Kapoor left the biopic of 'this legendary singer' for the Rs 4,000 crore 'Ramayana', said Anurag Basu. | ४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..

४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सध्या त्याच्या आगामी 'रामायण' (Ramayan Movie) चित्रपटामुळे चर्चेत आहे. नितेश तिवारी (Niteish Tiwari) यांच्या दिग्दर्शनाखाली बनणाऱ्या या चित्रपटाचे बजेट ४००० कोटी रुपये आहे. या चित्रपटात रणबीर कपूर भगवान रामाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर साई पल्लवी (Sai Pallavi) सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट दोन भागात बनवला जात आहे. चित्रपटाचा पहिला भाग २०२६ मध्ये प्रदर्शित होणार आहे. तर, दुसरा भाग २०२७ मध्ये प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, एक नवीन बातमी समोर येत आहे आणि ती म्हणजे रणबीर कपूरने भगवान रामाची भूमिका साकारण्यासाठी 'किशोर कुमार यांच्या बायोपिक'मध्ये काम करण्यास नकार दिला आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनुराग बसू दिग्दर्शित 'किशोर कुमार' यांच्या बायोपिकसाठी आधी रणबीर कपूरला विचारण्यात आले होते. पण नंतर बातमी आली की आमिर खान या चित्रपटात काम करणार आहे. आता बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत अनुराग बसू म्हणाले, ''त्यांना आणि रणबीरला या चित्रपटात एकत्र काम करायचे होते, पण वेळापत्रकातील अडचणी आणि इतर गोष्टींमुळे ते शक्य झाले नाही.'' त्यांनी सांगितले की, ''हा निर्णय रणबीरसाठी खूप कठीण होता. पण त्याला एक चित्रपट निवडण्यास भाग पाडले गेले.''

रणबीरने केली 'रामायण'ची निवड

अनुराग बसू पुढे म्हणाले की,''रणबीरने किशोर कुमार यांचा बायोपिक सोडून 'रामायण' निवडला. त्याच्याकडे एक पर्याय होता, पण आधी कोणत्या चित्रपटात काम करायचे हे निवडणे कठीण होते. जेव्हा रणबीरने रामायण निवडले तेव्हा मला हा निर्णय योग्य वाटला.'' रणबीर कपूरने २०१२ मध्ये 'बर्फी' आणि २०१७ मध्ये 'जग्गा जासूस'मध्ये अनुराग बसूसोबत काम केले होते.

Web Title: Ranbir Kapoor left the biopic of 'this legendary singer' for the Rs 4,000 crore 'Ramayana', said Anurag Basu.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.