लग्नानंतर रणबीरच्या आलिशान घरात गृहप्रवेश करणार आलिया; पाहा गौरी खानने डिझाइन केलेलं रणबीरचं घर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 02:10 PM2022-04-14T14:10:23+5:302022-04-14T14:11:19+5:30

Ranbir Alia Wedding: सेलिब्रिटींची लक्झरी लाइफस्टाइल आणि त्यांची आलिशान घरं हे कायमच नेटकऱ्यांसाठी आकर्षणाचे विषय ठरले आहेत. त्यामुळे लग्नानंतर आलिया राहायला जाणार असलेलं घर कसं आहे हे जाणून घेण्यासाठी नेटकरी प्रयत्न करत आहेत.

ranbir kapoor home vastu apartment pali hill inside photos | लग्नानंतर रणबीरच्या आलिशान घरात गृहप्रवेश करणार आलिया; पाहा गौरी खानने डिझाइन केलेलं रणबीरचं घर

लग्नानंतर रणबीरच्या आलिशान घरात गृहप्रवेश करणार आलिया; पाहा गौरी खानने डिझाइन केलेलं रणबीरचं घर

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांची लग्नघटिका जवळ आली आहे. त्यामुळे येत्या काही तासांमध्येच ही जोडी सहजीवनाची शपथ घेणार आहेत. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर आलिया-रणबीरच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे. यात त्यांच्या मेहंदीसोहळ्यापासून ते त्यांच्या डिझायनर कपड्यांपर्यंत प्रत्येक गोष्टींची चर्चा होत आहे. या लग्नातील प्रत्येक अपडेट मिळावेत यासाठी नेटकरी उत्सुक आहेत. त्यातच आता लग्नानंतर आलिया तिच्या सासरच्या घरात प्रवेश करणार आहे. त्यामुळे रणबीरचं घर नेमकं कसं आहे हे पाहण्यासाठी नेटकरी उत्सुक आहेत.

सेलिब्रिटींची लक्झरी लाइफस्टाइल आणि त्यांची आलिशान घरं हे कायमच नेटकऱ्यांसाठी आकर्षणाचे विषय ठरले आहेत. त्यामुळे लग्नानंतर आलिया राहायला जाणार असलेलं घर कसं आहे हे जाणून घेण्यासाठी नेटकरी प्रयत्न करत आहेत. यात रणबीरच्या घराचा एक फोटो व्हायरल होत आहे. हे घर प्रसिद्ध इंटेरिअर डिझायनर गौरी खानने डिझाइन केलं आहे.

लग्नानंतर आलिया पाली हिल येथील रणबीरच्या वास्तु अपार्टमेंटमध्ये गृहप्रवेश करणार आहे. या घरात रणबीर २०१६ ला शिफ्ट झाला होता. यापूर्वी रणबीर चेंबूरला त्याच्या जुन्या घरात राहत होता. रणबीरचं हे घर प्रचंड मोठं असून त्याच्या सोयीनुसार गौरी खानने ते डिझाइन केलं आहे. या घराचं काम झाल्यानंतर गौरीने सोशल मीडियावर एक फोटोदेखील शेअर केला होता.

दरम्यान, रणबीरने २००७ मध्ये संजय लीला भन्साळीच्या सावरियाँ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. त्यानंतर बचना ऐ हसीनों, वेकअप सिड, अजब प्रेम की गजब कहानी, राजनीति, रॉकस्टार, बर्फी आणि ये जवानी है दिवानी, असे अनेक सुपरहिट चित्रपट दिले. तसंच येत्या काळात त्याचा ब्रह्मास्त्र हा चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title: ranbir kapoor home vastu apartment pali hill inside photos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.