रणबीर कपूरनं भर कार्यक्रमात शाहरुख खानला म्हटलं होतं 'ओव्हर अॅक्टर', त्यावर पठाण म्हणाला- 'जेवढ्या तुझ्या...'
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2023 14:38 IST2023-01-28T14:37:28+5:302023-01-28T14:38:51+5:30
Shahrukh Khan And Ranbir Kapoor : शाहरुख खान आणि रणबीर कपूरचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये शाहरुख आणि रणबीर एकमेकांची खिल्ली उडवताना दिसत आहेत.

रणबीर कपूरनं भर कार्यक्रमात शाहरुख खानला म्हटलं होतं 'ओव्हर अॅक्टर', त्यावर पठाण म्हणाला- 'जेवढ्या तुझ्या...'
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shahrukh Khan) त्याच्या 'पठाण' (Pathaan) या नव्या चित्रपटाच्या यशामुळे सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. अशा परिस्थितीत त्यांचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. शाहरुख खान व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रणबीर कपूर(Ranbir Kapoor)ही दिसत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये शाहरुख आणि रणबीर कपूर दोघेही एकमेकांची खिल्ली उडवताना दिसत आहे.
शाहरुख खान आणि रणबीर कपूर यांचा हा व्हिडीओ फिल्मफेअर पुरस्कारादरम्यानचा आहे. व्हिडिओमध्ये शाहरुख रणबीरला म्हणतो, 'बाय द वे, रणबीर, मी गेल्या दोन वर्षांत इमरानसोबत तुझे होस्टिंग पाहिले आहे आणि तू चांगले काम केले आहेस.' याबद्दल रणबीरने त्याचे आभार मानले आहेत. त्यानंतर शाहरुख खान पुढे म्हणतो, 'पण मला वाटतं की तू स्टेजवर थोडं ओव्हरअॅक्ट करत आहेस, म्हणून या वर्षी मी विनंती करतो की कृपया ओव्हरअॅक्ट करू नकोस यार.'
रणबीरने शाहरुखला प्रत्युत्तर दिले. तो म्हणाला, 'जर मी ओव्हर अॅक्ट केले तर फिल्मफेअरला त्याचे नाव बदलून डॉन २ करावे लागेल.' यावर शाहरुख खान म्हणतो, 'सांभाळून हिरो... बालपणापासून तुझ्या जेवढ्या गर्लफ्रेंड्स झाल्या नाहीत तेवढ्या माझ्याकडे त्याच्यापेक्षा जास्त फिल्मफेअर पुरस्कार आहेत.' शाहरुख खान आणि रणबीर कपूर यांचा अवॉर्ड फंक्शन दरम्यानचा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.