सिक्स पॅक्स, मसल्स आणि टोन्ड बॉडी! 'रामायण'साठी रणबीरचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 10:45 AM2024-04-25T10:45:42+5:302024-04-25T10:46:15+5:30

Ranbir kapoor: रणबीर सध्या तिच्या फिटनेसवर जोर देत असून त्याच्या फिजिकल ट्रेनरने त्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

ranbir-kapoor-drastic-transformation-for-lord-ram-amid-nitesh-tiwari-film-ramayana-shooting | सिक्स पॅक्स, मसल्स आणि टोन्ड बॉडी! 'रामायण'साठी रणबीरचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन

सिक्स पॅक्स, मसल्स आणि टोन्ड बॉडी! 'रामायण'साठी रणबीरचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) लवकरच रामायण या सिनेमात झळकणार आहे. त्यामुळे सध्या तो सातत्याने चर्चेत येत आहे. या सिनेमासाठी रणबीर प्रचंड मेहनत घेत असून त्याची ही मेहनत दिसून येत आहे. सध्या सोशल मीडियावर त्याचे काही फोटो व्हायरल होत आहेत. यात त्याचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन दिसून येत आहे.

रणबीर सध्या तिच्या फिटनेसवर जोर देत असून त्याच्या फिजिकल ट्रेनरने त्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये रणबीरचं जबरदस्त ट्रन्सफॉर्मेशन झाल्याचं दिसून येत आहे.

रणबीरचा फिटनेस ट्रेनर शिवोहम याने त्यांच्या इन्स्टाग्रामवर रणबीरचे तीन फोटो शेअर केले आहेत.  यात पहिला फोटो animal  सिनेमातील आहे. या सिनेमासाठी रणबीरने त्याचं वजन वाढवलं होतं. त्यानंतर त्याने रणबीरचे आणखी दोन फोटो शेअर केले आहेत. ज्यात त्याचे सिक्स पॅक्स, मसल्स आणि टोन्ड बॉडी स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळे रामायण या सिनेमासाठी तो प्रचंड मेहनत घेत असल्याचं पाहायला मिळतं.

यापूर्वीही रणबीरचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या  व्हिडीओमध्ये तो फिटनेससाठी स्विमिंग, टेकडीवर चढणे, सायकलिंग, रनिंग यांसारखा वर्कआऊट करत होता. त्यानंतर आता त्याचे जीममधील फोटो व्हायरल झाले आहेत.

दरम्यान, नितेश तिवारी यांच्या रामायण या सिनेमात रणबीर प्रभू रामचंद्रांची भूमिका साकारत आहे. तर साऊथ ब्युटी साई पल्लवी सीतेच्या रुपात पाहायला मिळणार आहे. तसंच सनी देओल हनुमानाची भूमिका वठवत आहे. 

Web Title: ranbir-kapoor-drastic-transformation-for-lord-ram-amid-nitesh-tiwari-film-ramayana-shooting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.