'बन ठन चली', 'छैय्या छैय्या' गाण्यांवर रणबीर कपूर थिरकला, 'अ‍ॅनिमल' च्या रॅपअप पार्टीत धम्माल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2023 10:55 IST2023-07-11T10:54:14+5:302023-07-11T10:55:06+5:30

वर्षाच्या अखेरीस सिनेमा प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे.

ranbir kapoor dances on iconic songs during animal movie wrap up party video viral | 'बन ठन चली', 'छैय्या छैय्या' गाण्यांवर रणबीर कपूर थिरकला, 'अ‍ॅनिमल' च्या रॅपअप पार्टीत धम्माल

'बन ठन चली', 'छैय्या छैय्या' गाण्यांवर रणबीर कपूर थिरकला, 'अ‍ॅनिमल' च्या रॅपअप पार्टीत धम्माल

अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सध्या आगामी 'अ‍ॅनिमल' सिनेमामुळे चर्चेत आहे. लांब केस, वाढलेली दाढी आणि डोळ्यात आग असा एकंदर त्याचा खतरनाक लुक बघायला मिळतोय. अ‍ॅनिमलचे शूट पूर्ण झाले असून सिनेमाच्या रॅपअप पार्टीत रणबीर दिलखुलासपणे नाचला आहे. 'छैय्या छेय्या' आणि 'बन ठन के चली बोलो' या आयकॉनिक गाण्यांवर त्याने डान्स केला आहे. याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय.

संदीप रेड्डी वांगाच्या 'अ‍ॅनिमल' सिनेमात रश्मिका मंदाना, अनिल कपूर तसंच बॉबी देओलही मुख्य भूमिकेत आहेत. क्रू मेंबर्ससोबत डान्स करताना रणबीरचा व्हिडिओ चाहत्यांच्या भलताच पसंतीस पडला आहे. वर्षाच्या अखेरीस सिनेमा प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. पांढरा शर्ट, काळी ट्रॅकपँट आणि डोक्यावर कॅप अशा कॅज्युअल लुकमध्ये रणबीर पाहायला मिळत आहे. त्याचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

'अ‍ॅनिमल' या आधी ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र मेकर्सने सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली. आता सिनेमा १ डिसेंबर रोजी रिलीज होत आहे. सनी देओलच्या 'गदर 2' सोबत टक्कर नको म्हणून रणबीरचा 'अॅनिमल' पुढे ढकलल्याची जोरदार चर्चा झाली. मात्र व्हीएफएक्सचे काम राहिले असल्याने रिलीज डेट पुढे ढकलत असल्याचं मेकर्सने स्पष्ट केलं.

Web Title: ranbir kapoor dances on iconic songs during animal movie wrap up party video viral