लेकीचा पहिला स्पर्श अन् Ranbir Kapoor च्या डोळ्यांत पाणी! Alia Bhatt ही झाली भावूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2022 12:40 IST2022-11-08T09:48:26+5:302022-11-08T12:40:49+5:30
Ranbir kapoor : कपूर आणि भट कुटुंबीयांनी मिळून छोट्या राजकुमारीचे स्वागत केलं. लेकीला आपल्या कवेत घेताच राणबीर कपूरच्या डोळ्यांतील आनंद अश्रू थांबण्याचे नाव घेत नव्हते.

लेकीचा पहिला स्पर्श अन् Ranbir Kapoor च्या डोळ्यांत पाणी! Alia Bhatt ही झाली भावूक
रणबीर कपूर ( Ranbir Kapoor) आणि आलिया भट (Alia Bhatt)आईबाबा झाले आहेत. कपूर आणि भट कुटुंबांचा आनंद गगनात मावेनासा झालाय. सध्या आलिया व रणबीरवर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. 6 नोव्हेंबरला आलिया आणि रणबीरच्या राजकन्येचा जन्म झाला. मुलगी रणबीर की आलियावर गेलीय?, बाळाचा पहिला फोटो कधी समोर येणार असे असंख्य प्रश्न चाहत्यांच्या मनात आहे. डॅडी झालेल्या रणबीर कपूरची लेकीला पाहिल्यावर पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
आलिया भटने तिच्या प्रेग्नेन्सीची घोषणा केलीपासून रणबीर कपूरने मुलगी हवी असल्याची जाहिर कबूली दिली होती आणि त्याची इच्छा पूर्ण झाली आहे. काल ६ नोव्हेंबरला आलियाला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. कपूर आणि भट कुटुंबीयांनी मिळून छोट्या राजकुमारीचे स्वागत केले आणि सर्वजण खूप आनंदी झाले. डॅडी रणबीरचे पहिल्यांदाच राजकुमारीला आपल्या कवेत घेताच डोळ्यातील आनंद अश्रू थांबण्याचे नाव घेत नव्हते.
बॉलीवूड लाईफच्या रिपोर्टनुसार, कपूर कुटुंबाच्या जवळच्या एका सूत्राने खुलासा केला की, जेव्हा रणबीर कपूरने आपल्या मुलीला पहिल्यांदा पाहिले तेव्हा संपूर्ण कुटुंब आनंदात होते, परंतु रणबीर आपल्या मुलीला पाहून भावूक झाला. अभिनेत्याने आपल्या मुलीला हातात घेताच तो रडू लागला आणि रणबीरला रडताना पाहून सर्वांच्या डोळ्यात पाणी आले."
आलिया व रणबीरने याचवर्षी एप्रिल महिन्यात लग्न केलं. अगदी मोजक्या कौटुंबिक सदस्यांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला होता. या लग्नाची जोरदार चर्चा झाली. लग्नानंतर उण्यापुºया दोनच महिल्यात या जोडप्यानं गुडन्यूज शेअर केली होती. जूनमध्ये आलियाने सोनोग्राफी रुममधून एक फोटो शेअर करत आपण आई होणार असल्याची गोड बातमी दिली होती.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"