रणबीर कपूर, भन्साळी आणि मनोज वाजपेयी पाठोपाठ अभिनेत्री तारा सुतारियाला कोरोनाची लागण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2021 18:07 IST2021-03-13T18:06:35+5:302021-03-13T18:07:35+5:30

अभिनेता रणबीर कपूर, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी, अभिनेता मनोज वाजपेयी यांच्या पाठोपाठ आता अभिनेत्री तारा सुतारियालाही कोरोनाची लागण झाली आहे.

Ranbir Kapoor, Bhansali and Manoj Vajpayee followed by actress Tara Sutaria infected with corona | रणबीर कपूर, भन्साळी आणि मनोज वाजपेयी पाठोपाठ अभिनेत्री तारा सुतारियाला कोरोनाची लागण

रणबीर कपूर, भन्साळी आणि मनोज वाजपेयी पाठोपाठ अभिनेत्री तारा सुतारियाला कोरोनाची लागण

देशभरात कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होताना दिसत आहे आणि कोरोनाच्या विळख्यात बॉलिवूडचे सेलिब्रेटीदेखील अडकत चालले आहेत. अभिनेता रणबीर कपूर, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी, अभिनेता मनोज वाजपेयी यांच्या पाठोपाठ आता अभिनेत्री तारा सुतारियालाही कोरोनाची लागण झाली आहे. 

फिल्मफेअरच्या रिपोर्टनुसार, तारा सुतारियाला कोरोनाची लागण झाली आहे. नुकतेच तिने तडप चित्रपटाचे शूटिंग संपविले आहे. यात तिच्यासोबत अहान शेट्टी मुख्य भूमिकेत आहे. दिग्दर्शक मिलन लुथारियाचा हा चित्रपट २४ सप्टेंबरला रिलीज होणार आहे.


सध्या बॉलिवूडच्या बऱ्याच सेलिब्रेटींना कोरोनाच्या जाळ्यात अडकताना दिसत आहेत. मागील काही दिवसांत अभिनेता रणबीर कपूर, मनोज वाजपेयी, आशिष विद्यार्थी यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
अभिनेता आशिष विद्यार्थीनेदेखील कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगत इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यात त्याने सांगितले की, माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कृपया तपासणी करून घ्या. मला कोरोनाचे कोणतेच लक्षण नाहीत, लवकरच मी बरा होईन. तुमचे प्रेम आणि शुभेच्छा माझ्यासाठी अमूल्य आहे. अलशुक्रान बंधु, अलशुक्रान जिंदगी.


मनोज वाजपेयीच्या टीमने त्याला कोरोना झाल्याच्या वृत्ताला दुजोरा देत एक स्टेटमेंट जारी केले होते. यात म्हटल्यानुसार, दिग्दर्शकाला कोरोना झाल्यानंतर मनोज वाजपेयीनेही कोव्हिड 19 टेस्ट केली. त्याचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. यानंतर सिनेमाचे शूटींग काही महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आले आहे. तूर्तास मनोज वाजपेयीची प्रकृती स्थिर आहे आणि तो घरीच क्वारंटाईन असून विश्रांती घेतोय.

Web Title: Ranbir Kapoor, Bhansali and Manoj Vajpayee followed by actress Tara Sutaria infected with corona