रणबीर-आर्यन खान एकाच फ्रेममध्ये! 'या' ५ बड्या स्टार्सचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 15:33 IST2026-03-04T15:32:29+5:302026-03-04T15:33:02+5:30
या कारणासाठी एकत्र आले बॉलिवूड स्टार्स

रणबीर-आर्यन खान एकाच फ्रेममध्ये! 'या' ५ बड्या स्टार्सचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल
२०२५ मध्ये नेटफ्लिक्सवर आलेल्या ‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’ या वेब सीरिजच्या जबरदस्त यशानंतर आर्यन खानची लोकप्रियता गगनाला भिडली आहे. या सीरिजद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करून आर्यनने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. सध्या सोशल मीडियावर आर्यनच्या एका नवीन फोटोची जोरदार चर्चा होत आहे, कारण या फोटोत तो बॉलिवूडचा सुपरस्टार रणबीर कपूरसोबत दिसून येत आहे. हे दोन मोठे स्टार्स कशासाठी एकत्र आले असतील असा चाहत्यांना प्रश्न पडला आहे.
या व्हायरल फोटोचे वैशिष्ट्य म्हणजे यात केवळ आर्यन आणि रणबीरच नाहीत, तर बॉलिवूडचे इतर तीन तरुण कलाकारही दिसत आहेत. वरुण धवन, अर्जुन कपूर आणि ‘बॉर्डर २’ फेम अहान शेट्टी यांनीही या फोटोत पोझ दिली आहे. एकाच फ्रेममध्ये बॉलिवूडचे हे पाच दिग्गज कलाकार एकत्र दिसल्याने इंटरनेटवर हा फोटो वाऱ्यासारखा पसरला असून, चाहत्यांकडून यावर कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
हे पाचही स्टार्स एकाच छताखाली का जमले, असा प्रश्न सर्वांना पडला होता. याचे निमित्त होते त्यांचा खास मित्र सिनान कादर याचा वाढदिवस. त्याच्या पार्टीला हे पाचही जण एकत्र आले होते. या पार्टीतील एक व्हिडिओ देखील समोर आला आहे, ज्यामध्ये सिनान केक कापताना दिसत आहे आणि हे सर्व कलाकार त्याला चिअर करताना पाहायला मिळत आहेत.
रणबीर कपूर नेहमीच आपल्या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत असतो, मात्र आता आर्यन खानच्या प्रत्येक हालचालीवरही पापाराझी आणि चाहत्यांची नजर असते. ‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’च्या यशानंतर आर्यन एक ब्रँड बनला असून, जेव्हा कधी तो सार्वजनिक ठिकाणी स्पॉट होतो, तेव्हा त्याचे व्हिडिओ काही क्षणात व्हायरल होतात. मित्राच्या बर्थडे पार्टीतील या फोटोंनी पुन्हा एकदा आर्यनच्या स्टारडमची प्रचिती दिली आहे.