लगीनसराई! रणबीर कपूर-आलिया भटच्या लग्नासाठी सजला कृष्णा-राजचा बंगला, नवरदेवाची दिसली झलक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 12:51 IST2022-04-12T12:33:26+5:302022-04-12T12:51:00+5:30

आलिया भट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) जवळपास 4 वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. या स्टार कपलच्या लग्नाची अनेक दिवसांपासून चाहते वाट पाहत आहेत.

ranbir kapoor and alia bhatt wedding krishna raj bungalow lights up ranbir kapoor spotted for the first time | लगीनसराई! रणबीर कपूर-आलिया भटच्या लग्नासाठी सजला कृष्णा-राजचा बंगला, नवरदेवाची दिसली झलक

लगीनसराई! रणबीर कपूर-आलिया भटच्या लग्नासाठी सजला कृष्णा-राजचा बंगला, नवरदेवाची दिसली झलक

आलिया भट  (Alia Bhatt)  आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) जवळपास 4 वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. या स्टार कपलच्या लग्नाची अनेक दिवसांपासून चाहते वाट पाहत आहेत. बी-टाऊनमध्येही लोक या रॉयल वेडिंगची  (Ranbir-Alia’s Wedding) वाट पाहत आहेत. दरम्यान, आरके स्टुडिओ आणि राज कपूर यांचा बंगला उजळून निघाला आहे. त्यामुळे रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या कथित लग्नाच्या वृत्ताला दुजोरा मिळतोय. 

कृष्णा राज बंगल्यातील लाईटींग पाहून कळते की, कपूर कुटुंबीय रणबीर आणि आलियाच्या लग्नाची शाही तयारी करत आहेत. सध्या हा शाही विवाह पाहण्यासाठी प्रत्येकजण आतुर झाला आहे.

अलीकडेच व्हिडिओही समोर आला होता आणि त्यात फुलांनी भरलेले ट्रकही दिसले होते. ज्यामध्ये आलिया आणि रणबीरच्या लग्नाला पिवळ्या आणि पांढऱ्या फुलांनी सजवले जात असल्याचे दिसून येते. अलीकडेच रणबीर कपूरही लग्नाच्या चर्चांदरम्यान वेन्यूबाहेर स्पॉट झाला. रणबीर पूर्वीपर्यंत त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होता. लग्नापूर्वी त्याला त्याच्या सर्व कामाच्या कमिटमेंट्स पूर्ण करायच्या आहेत. म्हणूनच तो पूर्वी श्रद्धा कपूरसोबत लव रंजनच्या पुढच्या चित्रपटाचे शूटिंग करत होता.

 बिझी शेड्यूलमुळे रणबीर कपूर लग्नाच्या तयारीत सहभागी होऊ शकला नाही. त्यामुळे आलिया आणि नीतू कपूर लग्नाच्या तयारीत व्यस्त होत्या. दुसरीकडे, आलिया-रणबीरच्या लग्नाच्या तारखेबाबत अजूनही संभ्रम आहे. आलिया-रणबीर 14 किंवा 17 तारखेला कोणत्या तारखेला लग्न करणार आहेत याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहितीसमोर आलेली नाही. 
 

Web Title: ranbir kapoor and alia bhatt wedding krishna raj bungalow lights up ranbir kapoor spotted for the first time