'लव्ह अँड वॉर'नंतर रणबीर-आलिया पुन्हा एकत्र दिसणार? 'या' दिग्दर्शकासोबत करणार काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 13:18 IST2025-10-08T13:18:05+5:302025-10-08T13:18:30+5:30
आलिया भट आणि रणबीर कपूर ही जोडी ऑन आणि ऑफस्क्रीनही हिट असते. रिअल लाईफ नवरा बायको असलेलं हे कपल ...

'लव्ह अँड वॉर'नंतर रणबीर-आलिया पुन्हा एकत्र दिसणार? 'या' दिग्दर्शकासोबत करणार काम
आलिया भट आणि रणबीर कपूर ही जोडी ऑन आणि ऑफस्क्रीनही हिट असते. रिअल लाईफ नवरा बायको असलेलं हे कपल पडद्यावरही लोकप्रिय आहे. दोघांनी 'ब्रह्मास्त्र' हा हिट सिनेमा दिला. तसंच ते संजय लीला भन्साळींच्या आगामी 'लव्ह अँड वॉर'मध्ये दिसणार आहेत. विशेष म्हणजे आणखी एका प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या आगामी सिनेमातही रणबीर-आलिया ही जोडी दिसणार असल्याची चर्चा आहे.
'मिड डे'च्या रिपोर्टनुसार, दिग्दर्शक-निर्माता करण जोहर आगामी सिनेमात आलिया भट आणि रणबीर कपूरला कास्ट करणार आहे. अद्याप याची अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र रिपोर्टनुसार, हे नवरा बायको लव्ह अँड वॉर नंतर पुन्हा स्क्रीन शेअर करु शकतात. यासोबत सिनेमात आणखी एका हिरोचीही एन्ट्री होणार आहे. हा हिरो पुन्हा विकी कौशलच असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आलिया भट आणि विकी कौशलनेही एकत्र काम केलं आहे. 'राजी' सिनेमात ते दिसले होते. शिवाय आता 'लव्ह अँड वॉर'मध्येही दिसणार आहेत. तर विकीने रणबीर कपूरच्या 'संजू' सिनेमात छोटी भूमिका केली होती. आता ही तिकडी एकत्र आल्यावर काय होतं हे पाहायला मजा येणार आहे.