"मी चांगला पती नाही.." वेडिंग अनिव्हर्सरीच्या दिवशी रणबीर कपूरनं केलं हैराण करणार वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2023 14:19 IST2023-04-14T11:16:29+5:302023-04-14T14:19:37+5:30
अलीकडेच एका मुलाखतीत रणबीरने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत भाष्य केलं.

"मी चांगला पती नाही.." वेडिंग अनिव्हर्सरीच्या दिवशी रणबीर कपूरनं केलं हैराण करणार वक्तव्य
Ranbir Kapoor On Alia Bhatt: रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी गेल्या वर्षी 14 एप्रिल रोजी लग्न केले आणि आज हे कपल त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करत आहे. त्याचबरोबर हे जोडपे एका गोंडस मुलीचे ाी-बाबा देखील झाले आहेत. अलीकडेच एका मुलाखतीत रणबीरने त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी सांगितले. यादरम्यान अभिनेत्याने सांगितले की तो पती म्हणून स्वतःचे कसे मूल्यांकन करतो. रणबीर म्हणाला होता की, तो चांगला नवरा नसला तरी त्याला अधिक चांगले बनण्याची इच्छा होती. तो म्हणाला की तो 'योग्य मार्गावर' आहे.
काय म्हणाला रणबीर कपूर?
फ्री प्रेस जर्नलला दिलेल्या मुलाखतीत रणबीरने अलीकडेच आलियासोबतच्या त्याच्या लग्नाविषयी सांगितले आणि तो स्वतःला कोणत्या प्रकारचा नवरा समजतो याचा देखील खुलासा केला.अभिनेता म्हणाला, "एकंदरीत तुम्ही चांगले करत आहात असे तुम्हाला वाटते. पण आयुष्य कधीच पूर्ण होणारी गोष्ट नाही आहे. मला असे वाटत नाही की मी एक चांगला मुलगा आहे, चांगला नवरा आहे किंवा भाऊ आहे. पण माझी चांगली बनण्याची इच्छा आहे, जोपर्यंत तुम्हाला याची जाणीव असते तोपर्यंत तुम्ही योग्य मार्गावर आहात.
आलिया भट आणि रणबीर कपूर यांनी काही वर्षे त्यांचं रिलेशनशीप अगदी खाजगी ठेवले होते. मात्र, लग्नाआधी ते अनेकदा कौटुंबिक कार्यक्रम आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसले. या जोडप्याने 14 एप्रिल 2022 रोजी त्यांच्या मुंबईतल्या घरी लग्नगाठ बांधली. या लग्नाला जवळेच मित्र आणि कुटुंब उपस्थित होते. लग्नाच्या काही महिन्यानंतर आलियाने गोंडस बाळाला जन्म दिला.
वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर रणबीर कपूर शेवटचा श्रद्धा कपूरसोबत 'तू झूठी मैं मक्कर' सिनेमात दिसला होता. यात अनुभव सिंह बस्सी, डिंपल कपाडिया आणि बोनी कपूर यांच्यादेखील भूमिका होत्या. लवकरच तो रश्मिका मंदानासोबत एनिमल सिनेमात दिसणार आहे.