आलिया भटच्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर आहे या व्यक्तीसोबतचा फोटो?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2020 17:36 IST2020-03-06T17:30:06+5:302020-03-06T17:36:02+5:30
प्रसारमाध्यमांनी कैद केलेल्या आलियाच्या या फोटो आणि व्हिडिओमध्ये आपल्याला तिच्या हातात तिचा मोबाईल पाहायला मिळत आहे.

आलिया भटच्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर आहे या व्यक्तीसोबतचा फोटो?
आलिया भट आणि रणबीर कपूरच्या लग्नाची सध्या बी-टाऊनमध्ये जोरदार चर्चा आहे. 2020 डिसेंबर मध्ये आलिया आणि रणबीर लग्न करणार असल्याची जोरदार चर्चा गेल्या काही दिवसांपासून ऐकायला मिळत आहे. त्या दोघांची मुख्य भूमिका असलेला ब्रम्हास्त्र हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ते दोघे लग्न करणार असल्याचे देखील म्हटले जात आहे.
आलिया आणि रणबीर यांचे कपल त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडते. नुकतेच आलियाला गिल्टी या वेबसिरिजच्या स्क्रीनिंगच्यावेळी नुकतेच पाहाण्यात आले. या स्क्रिनिंगला आलियाने स्टायलिश अंदाजात हजेरी लावली. या स्क्रिनिंगच्यावेळी प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यांमध्ये आलियाचा स्टायलिश अंदाज कैद करण्यात आला. पण आता आलियाच्या स्टायलिश अंदाजाची नव्हे तर एका वेगळ्याच गोष्टीची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
प्रसारमाध्यमांनी कैद केलेल्या आलियाच्या या फोटो आणिलि व्हिडिओमध्ये आपल्याला तिच्या हातात तिचा मोबाईल पाहायला मिळत आहे. या मोबाईलच्या होम स्क्रीनवर रणबीर आणि तिचा रोमँटिक अंदाजातील फोटो दिसत असल्याचा अंदाज त्या दोघांचे चाहते लावत आहेत.
आलिया आणि रणबीरच्या लग्नाची चर्चा सुरू असताना गेल्या काही दिवसांपूर्वी आलियाने त्यांच्या लग्नाच्या चर्चांविषयी मीडियाशी बोलताना आपले मत व्यक्त केले होते. झुम वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आलियाने सांगितले होते की, सध्या कोण नको त्या अफवा पसरवत आहे तेच मला कळत नाहीये. प्रत्येक तीन आठवड्यांनंतर मला माझ्या लग्नाची नवीन तारीख आणि ठिकाण ऐकायला मिळत आहे. खरे सांगू तर या गोष्टी मी आता एन्जॉय करायला लागले आहे. या बातम्यांमुळे माझे आता मनोरंजन होते एवढेच मी सांगेन.