आलिया-रणबीरच्या लग्नाचा Unseen video समोर; पाहुण्यांसाठी होता खास ड्रेस कोड?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2022 19:18 IST2022-04-14T19:18:18+5:302022-04-14T19:18:45+5:30
Ranbir Alia Wedding: रणबीर आणि आलियाची लग्नातील एक झलक पाहता यावी यासाठी चाहते आतुर असतानाच थेट लग्नातील व्हिडीओ समोर आल्यामुळे त्यांना जणू एक प्रकारची पर्वणीच मिळाली आहे.

आलिया-रणबीरच्या लग्नाचा Unseen video समोर; पाहुण्यांसाठी होता खास ड्रेस कोड?
बॉलिवूडमधील बहुप्रतिक्षीत आणि बहुचर्चित ठरलेला आलिया-रणबीरचा विवाहसोहळा अखेर संपन्न झाला आहे. मुंबईतील पाली हिल येथे असलेल्या वास्तू अपार्टमेंटमध्ये या दोघांनी लग्नगाठ बांधली. पंजाबी पद्धतीने पार पडलेल्या या लग्नसोहळ्याला अगदी मोजक्या पाहुण्याची उपस्थिती होती.सध्या सोशल मीडियावर या लग्नाची चर्चा असून यात लग्नातील एक अनसीन व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
रणबीर आणि आलियाची लग्नातील एक झलक पाहता यावी यासाठी चाहते आतुर असतानाच थेट लग्नातील व्हिडीओ समोर आल्यामुळे त्यांना जणू एक प्रकारची पर्वणीच मिळाली आहे. सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानी यांच्या अधिकृत युट्यूब पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
दरम्यान, या व्हिडीओमध्ये रणबीर आणि आलिया यांचा चेहरा जरा नीट दिसत नसला. तरीदेखील त्यांची वरमाला विधी सुरु असल्याचं लक्षात येतं. तसंच या लग्नसोहळ्यामुळे आलेल्या पाहुण्यांनाही ड्रेस कोड दिल्याचं पाहायला मिळत आहे. या लग्नसमारंभात सहभागी झालेल्या पाहुण्यांनी लाइट पिंक आणि ऑफ व्हाइट रंगाचे कपडे परिधान केले होते.