Video: रणबीर-आलियाने लेकीसोबत साजरी केली धुळवड, राहाच्या क्युटनेसने पुन्हा वेधलं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 09:19 AM2024-03-26T09:19:22+5:302024-03-26T09:19:44+5:30

रणबीरला सर्वजण रंग लावताना दिसले. तर क्युट राहा सर्वांकडे कुतुहलाने बघत होती.

Ranbir Kapoor Alia Bhatt celebrates holi with Raha video goes viral | Video: रणबीर-आलियाने लेकीसोबत साजरी केली धुळवड, राहाच्या क्युटनेसने पुन्हा वेधलं लक्ष

Video: रणबीर-आलियाने लेकीसोबत साजरी केली धुळवड, राहाच्या क्युटनेसने पुन्हा वेधलं लक्ष

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट(Alia Bhat) बॉलिवूडमधलं पॉवरकपल. यंदाची होळी दोघांसाठीही खास होती कारण लाडकी लेक राहा त्यांच्यासोबत होती. राहाने पहिल्यांदाच धुळवड साजरी केली. रणबीर आणि आलिया लेकीला घेऊन त्यांच्या सोसायटीत आले. अपार्टमेंटमधील लोकांसोबत मिळून त्यांनी यंदाची धुळवड साजरी केली. रणबीरला सर्वजण रंग लावताना दिसले. तर क्युट राहा सर्वांकडे कुतुहलाने बघत होती.

रणबीर आणि आलिया लेक राहासह मुंबई स्थित पाली हिल येथील एका आलिशान अपार्टमेंटमध्ये राहतात. सध्या दोघंही लेक राहासोबत जास्तीत जास्त वेळ घालवताना दिसत आहेत. राहाला नवीन नवीन गोष्टी शिकवत आहेत. राहाने तर तिच्या क्युटनेसने सर्वांचंच मन जिंकलं आहे. तिची एक झलकही सोशल मीडियावर तुफान व्हायरल होते. मल्याळम अभिनेत्री नादियासोबत आलिया आणि रणबीर त्यांच्या घराखाली दिसले.  रणबीर एकदम कूल लूकमध्ये दिसत होता.  गुजिया खात सगळ्यांशी गप्पा मारत होता.  तर आलिया आणि राहा बाजूला उभ्या होत्या. यावेळी नादियाने रणबीर आणि आलियाला रंग लावला. तर राहासोबत गप्पा मारताना दिसली. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. नादियाने कॅप्शनमध्ये लिहिले, 'होळीच्या शुभेच्छा. रणबीर, आलिया आणि राहासोबत यंदाची धुळवड साजरी करायला मजा आली. '

व्हिडिओतील राहाचे हावभाव पाहून चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत. 'किती क्यूट आहे ही', 'हॅपी होली टू राहा' असं म्हणत नेटकऱ्यांनी प्रेमाचा वर्षाव केलाय. राहाचा जन्म नोव्हेंबर २०२२ साली झाला. गेल्या वर्षी ख्रिसमसला ती पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर आली तेव्हापासून सोशल मीडियावर केवळ तिचेच फोटो, व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

Web Title: Ranbir Kapoor Alia Bhatt celebrates holi with Raha video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.