फायनली...! रणबीर -आलियाने केले पक्के प्रॉमिस; व्हिडीओ पाहाल तर कळेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2020 14:18 IST2020-02-02T14:17:35+5:302020-02-02T14:18:55+5:30

‘ब्रह्मास्त्र’ या सुपरहिरो चित्रपटाच्या सेटवर रणबीर कपूर आणि आलिया भट यांची लव्हस्टोरी सुरु झाली. बघता बघता लव्हस्टोरी इतकी बहरली की, गोष्ट लग्नापर्यंत येऊन पोहोचली. पण ...

ranbir kapoor alia bhatt brahmastra gets release date | फायनली...! रणबीर -आलियाने केले पक्के प्रॉमिस; व्हिडीओ पाहाल तर कळेल

फायनली...! रणबीर -आलियाने केले पक्के प्रॉमिस; व्हिडीओ पाहाल तर कळेल

ठळक मुद्देरणबीर-आलियाचा हा सिनेमा गतवर्षी नाताळलाच रिलीज होणार होता. पण व्हीएफएक्स इफेक्टमुळे सिनेमाचे काम लांबले.

ब्रह्मास्त्र’ या सुपरहिरो चित्रपटाच्या सेटवर रणबीर कपूर आणि आलिया भट यांची लव्हस्टोरी सुरु झाली. बघता बघता लव्हस्टोरी इतकी बहरली की, गोष्ट लग्नापर्यंत येऊन पोहोचली. पण ‘ब्रह्मास्त्र’ची वाट पाहून मात्र प्रेक्षक थकले. पण प्रेक्षकांची ही प्रतीक्षा संपली आहे. होय, आलिया व रणबीरच्या ‘ब्रह्मास्त्र’ची रिलीज डेट अखेर जाहिर झालीय. यावर्षी 4 डिसेंबरला ‘ब्रह्मास्त्र’चा पहिला पार्ट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
आलियाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करून ही माहिती दिली आहे. तेही एका वेगळ्या अंदाजात. या व्हिडीओत रणबीर कपूर, अमिताभ बच्चन आणि ‘ब्रह्मास्त्र’चा दिग्दर्शक अयान मुखर्जी हटके अंदाजात ‘ब्रह्मास्त्र’ची रिलीज डेटची घोषणा करताना दिसत आहेत.


व्हिडीओत रणबीर कपूर अयानवर जाम चिडलेला दिसतोय. ‘ब्रह्मास्त्र’ कधी रिलीज होणार ते मला सांग. आता तर माझ्या घरचेही दोन वर्षांपासून तू काय करतोस, हे विचारत आहेत, असे रणबीर रागारागात अयानला विचारतो. यावर आपण काही वेगळे करण्याचा प्रयत्न करतोय. यात वेळ तर लागतोय. तुलाही माहितीय की, मी खूप प्रयत्न करतोय, असे अयान म्हणतो. पण रणबीर काही ऐकत नाही म्हटल्यावर तो रिलीज डेटची घोषणा करतो. 4 डिसेंबरला हा चित्रपट रिलीज होतोय,असे तो सांगतो. व्हिडीओत सरतेशेवटी अमिताभ बच्चनही रिलीज डेट सांगतात. मागून आलिया भटचाही आवाज ऐकायला येतो. ती आनंदात उड्या मारायला लागते.


खरे तर  रणबीर-आलियाचा हा सिनेमा गतवर्षी नाताळलाच रिलीज होणार होता. पण व्हीएफएक्स इफेक्टमुळे सिनेमाचे काम लांबले आणि ही रिलीज डेट पुढे ढकलली गेली होता.

Web Title: ranbir kapoor alia bhatt brahmastra gets release date

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.