​रणबीर-कॅटने केली एकत्र डान्स प्रॅक्टिस

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2016 11:07 IST2016-05-07T05:37:10+5:302016-05-07T11:07:10+5:30

कधी एके काळी एकमेकांशिवाय न राहणारे लव्ह बर्ड्स रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ आता एकमेकांचा चेहरादेखील पाहू इच्छित नाही. ...

Ranbir and Katte did a dance practice together | ​रणबीर-कॅटने केली एकत्र डान्स प्रॅक्टिस

​रणबीर-कॅटने केली एकत्र डान्स प्रॅक्टिस

ी एके काळी एकमेकांशिवाय न राहणारे लव्ह बर्ड्स रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ आता एकमेकांचा चेहरादेखील पाहू इच्छित नाही.

नात्यामध्ये असा दुरावा आला की, रणबीर व कॅटरिना ही नावे एका वाक्यात घेणेसुद्धा दोघांना मान्य नाही. मग अशी परिस्थिती असताना जर दोघांना एकत्र डान्स करायला सांगितला तर काय होईल?

असा पेच प्रसंग अनुराग बासूसमोर निर्माण झाला होता. ‘जग्गा जासूस’ चित्रपटातील एका गाण्याच्या डान्स रिहर्सलसाठी या दोघांना एकत्र प्रॅक्टिस करणे अपेक्षित होते.

डान्स म्हटल्यावर एकमेकांच्या जवळ येणे आलेच. एक शब्द न बोलणाऱ्या रणबीर-कॅटला एकत्र डान्स प्रक्टिस करायला सांगणे अनुरागला भलतेच जड गेले असणार.

पण काम तर काम आहे. कोरिओग्राफर गणेश आचार्यच्या अंधेरी येथील स्टुडिओमध्ये दोघांनी तब्बल तीन तास डान्स प्रक्टिस केली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघे एकदम प्रोफेशनल वागत होते. केवळ कामाशी काम अशीच त्यांची वागणूक होती. प्रॅक्टिसनंतर दोघे आपापल्या दिशेन निघून गेले. या गाण्यात दोघांनी काय केले ते तर गाणे रिलिज झाल्यावरच कळेल.

आधीच रखडलेला त्याचा जग्गा जासूस सिनेमा या दोघांच्या ब्रेकअपनंतर तर आणखीच लांबणीवर पडू लागला. चित्रपटाची काही दृश्ये मोरोक्कोमध्ये चित्रित करायची आहे. मात्र कॅट मॅडम तेथे जाण्यास टाळाटाळ करत आहे. आता रणबीर-कॅटला घेऊन शुटिंग पूर्ण कशी करायची याची चिंता अनुरागला आहे

Web Title: Ranbir and Katte did a dance practice together