एक्स- गर्लफ्रेन्ड आलियाच्या अफेअरच्या चर्चांनी सिद्धार्थ मल्होत्राचा जळफळाट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2018 21:22 IST2018-07-31T21:21:32+5:302018-07-31T21:22:41+5:30
आलियाचा एक्स बॉयफ्रेन्ड सिद्धार्थ मल्होत्रा अद्यापही रणबीर व आलियाची जवळीक पचवू शकलेला नाहीये.

एक्स- गर्लफ्रेन्ड आलियाच्या अफेअरच्या चर्चांनी सिद्धार्थ मल्होत्राचा जळफळाट!
रणबीर कपूरच्या ‘संजू’ने रेकॉर्डब्रेक कमाई केली. तिकडे आलिया भट्टच्या ‘राजी’नेही बाजी मारली. एकीकडे आलिया व रणबीरच्या या यशाची चर्चा होत असताना दुसरीकडे त्यांच्या पर्सनल लाईफबद्दलच्या चर्चेलाही ऊत आला. ‘ब्रह्मास्त्र’च्या शूटींगच्या निमित्ताने आलिया व रणबीर एकत्र आलेत. हळूहळू त्यांच्यात एक वेगळाच बॉन्ड निर्माण झाला आणि आता तर हे नाते बरेच पुढे गेलेय. पण आलियाचा एक्स बॉयफ्रेन्ड सिद्धार्थ मल्होत्रा हा मात्र अद्यापही रणबीर व आलियाची जवळीक पचवू शकलेला नाहीये.
सिद्धार्थ सोबत ब्रेकअप झाल्यानंतर आलिया रणबीरमध्ये गुंतली. पण सिद्धार्थ स्वत:ला सावरू शकलेला नाही. ताजी खबर खरी मानाल तर, अलीकडे सिद्धार्थ काहीसा विचित्र वागू लागला आहे. आलियाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करू लागला आहे. होय, नुकत्याच एका पार्टीत आलिया व सिद्धार्थ एकमेकांसमोर आलेत. आलियाने सिद्धार्थला हॅलो म्हटले. पण सिद्धार्थ मात्र आलियाकडे ढुंकूनही न बघता, तिथून चालता झाला. इतकेच नाही तर आलियाने सिद्धार्थला त्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. पण सिद्धार्थने तिच्या शुभेच्छांकडेही दुर्लक्ष केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आलियाने तिच्या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला सिद्धार्थला बोलवले होते. पण त्याने जाणे टाळले़ यावरून एक गोष्ट स्पष्ट आहे, आलियाला अन्य कुणासोबत पाहणे सिद्धार्थ खपवू शकत नाहीये.
आलियाने मात्र हे फार मनावर न घेण्याचे ठरवलेय. रणबीरसोबत सध्या तरी ती जाम खूश आहे.