‘द गाझी अटॅक’च्या शूटिंगवेळी सूर्यप्रकाशासाठी तडफडत होता राणा दग्गुबाती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2017 14:37 IST2017-02-08T09:07:15+5:302017-02-08T14:37:15+5:30

या महिन्यात रिलिज होणाºया बहुचर्चित ‘द गाजी अटॅक’ हा सिनेमा समुद्रातील तुफान युद्धावर आधारित आहे. सिनेमातील बरीचशी शूटिंग अंडर ...

Rana Daggubati was rushing for sunshine during shooting of 'The Gazi Attack' | ‘द गाझी अटॅक’च्या शूटिंगवेळी सूर्यप्रकाशासाठी तडफडत होता राणा दग्गुबाती

‘द गाझी अटॅक’च्या शूटिंगवेळी सूर्यप्रकाशासाठी तडफडत होता राणा दग्गुबाती

महिन्यात रिलिज होणाºया बहुचर्चित ‘द गाजी अटॅक’ हा सिनेमा समुद्रातील तुफान युद्धावर आधारित आहे. सिनेमातील बरीचशी शूटिंग अंडर वॉटर केली गेल्याने, शूटिंगदरम्यान आलेल्या अडचणींच्या आठवणी अभिनेता राणा दग्गुबाती याने कथन केल्या आहेत. ‘सूर्यप्रकाशासाठी अशरक्ष: तडफडत होतो’ अशा शब्दात त्याने शूटिंगदरम्यानचे कटू प्रसंग सांगितले आहेत. 



सिनेमात राणा नौसेना अधिकाºयाच्या भूमिकेत आहे. संकल्प रेड्डी यांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा १९७१ च्या भारत-पाक युद्धादरम्यान पाकिस्तानी पाणबुडी ‘पीएनएस गाजी’ रहस्यमयरीत्या गायब झाल्याच्या घटनेवर आधारित आहे. सिनेमातील बराचसा भाग हा संकल्प रेड्डी यांच्या ‘ब्लू फिश’ या पुस्तकावर आधारित आहे. 

सिनेमात राणा लेफ्टिनेंट अर्जुन वर्मा यांच्या भूमिकेत दिसणार आहे. यावेळी एका वृत्त एजन्सीबरोबर बोलताना राणाने सांगितले की, सिनेमाच्या शूटिंगच्या १८ व्या दिवशी मी सूर्यप्रकाशासाठी तडफडत होतो. जेव्हा तुम्हाला कित्येक दिवस सूर्यप्रकाश दिसत नाही, तेव्हा तुम्ही किनाºयावर आल्यानंतर स्वातंत्र्य मिळाल्याच्या आनंदात वावरल्याशिवाय राहात नाही. पुढे बोलताना राणा म्हणाला की, मला असे वाटते, नौसेनेच्या सैनिकांमध्ये कमालीचे धैर्य आणि हिंमत आहे. कारण कित्येक महिने ते पाण्याखाली राहून आपले जीवन व्यतित करतात. नौसेनेच्या सैनिकांना मी खरोखरच सॅल्यूट करू इच्छितो. 



सिनेमात तापसी पन्नू शरणार्थीच्या भूमिकेत दिसणार आहे. तर अतुल कुलकर्णी, के.के. मेनन, दिवगंत अभिनेता ओम पुरी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा सिनेमा १७ फेब्रुवारी रोजी हिंदी आणि तेलगुमध्ये रिलिज केला जाणार आहे. या सिनेमाविषयी गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता होती. भारत-पाक युद्धावर आधारित असल्याने हा सिनेमा अधिकच चर्चेत आला होता. आता लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांना बघावयास मिळणार असल्याने, सिनेमातील कलाकारांनी केलेली मेहनत बघावयास मिळेल. 

Web Title: Rana Daggubati was rushing for sunshine during shooting of 'The Gazi Attack'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.