जितेंद्र कुणासाठी करणार रॅम्पवॉक !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2017 19:07 IST2017-02-18T11:53:50+5:302017-02-18T19:07:37+5:30

बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेता जितेंद्र लवकरच रॅम्पवर दिसू शकतो. डिझायनर अर्चना कोचर हिने खास पुरुषांसाठी तयार केलेल्या कपड्यांचे प्रदर्शन करण्यासाठी ...

Rampawak to do Jitendra Kuno! | जितेंद्र कुणासाठी करणार रॅम्पवॉक !

जितेंद्र कुणासाठी करणार रॅम्पवॉक !

लिवूडमधील ज्येष्ठ अभिनेता जितेंद्र लवकरच रॅम्पवर दिसू शकतो. डिझायनर अर्चना कोचर हिने खास पुरुषांसाठी तयार केलेल्या कपड्यांचे प्रदर्शन करण्यासाठी जितेंद्रने होकार दिला असून रविवारी आयोजित करण्यात आलेल्या एका खास फॅशन शोमध्ये रॅम्पवॉक करताना तो दिसणार आहे. 

ज्येष्ठ अभिनेता जितेंद्र व अभिनेता व निर्माता अरबाज खान हे प्राण्याच्या कल्याणाकरिता एकत्र आले आहेत. स्मिता ठाकरे यांच्या मुक्ती फाऊंडेशनच्या प्रचारासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून यासाठी डिझायनर अर्चना कोचर यांनी पुरुष परिधानांची खास रेंज डिझाईन केली आहे. ‘फॉर एव्हर फ्रेण्ड’नावाच्या या फॅशन शोमध्ये क्रिकेटपटू जहीर खान व गायक शान देखील रॅम्पवॉक करताना दिसणार आहेत. 



आपल्या नव्या उपक्रमाबद्दल अर्चना कोचर यांनी माहिती दिली. कोचर म्हणाल्या, मी मुक्ती फाऊंडेशनसोबत प्राण्यांच्या कल्याणासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. असे आयोजन करण्याची ही पहिलीच वेळ असल्याने मी आनंदी आहे, मुक्ती फाऊंडेशनने संचालनाची जबाबदारी माझी मैत्रीण स्मिता हिने उचलली असून तिचे प्राण्यांवर विशेष प्रेम आहे. मला असे वाटते की प्राण्यांबद्दल संवेदनशीलता दर्शविण्यासाठी ही सर्वांत चांगली संधी आहे. यामुळे लोकांमध्ये जागरूकता निर्माण होईल. जितेंद्र यांनी या शोसाठी रॅम्पवर चालण्याची संमती दर्शविली आहे. विशेष म्हणजे या शोमध्ये प्रदर्शित केले जाणारे वस्त्र समकालीन भारतीय पुरुषांच्या पसंतीनुसार तयार करण्यात आले आहेत. 

जितेंद्र यांची रॅम्प वॉक करण्याची ही पहिली वेळ नसली तरी देखील एखाद्या ज्येष्ठ अभिनेत्याने प्राण्याच्या संस्थेसाठी पुढाकार घेण्यासाठी उचललेले हे पाऊल प्रशंसनीय आहे. 

Web Title: Rampawak to do Jitendra Kuno!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.