Rambha Car Accident: बॉलीवूड अभिनेत्रीच्या कारला कॅनडामध्ये अपघात; मुलीवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2022 09:10 IST2022-11-01T09:10:24+5:302022-11-01T09:10:46+5:30

रंभाने मुलीसाठी प्रार्थना करण्याची विनंती फॅन्सकडे केली आहे. रंभाने तिच्या उमेदीच्या काळात हिंदीसह तेलगू, कन्नड, तामिळ, मल्याळम, बंगाली, भोजपुरी आणि इंग्रजी सिनेमांमध्ये काम केले आहे.

Rambha Car Accident: Bollywood Actress rambha indrakumar's Car Accident in Canada; injured girl is being treated in the hospital | Rambha Car Accident: बॉलीवूड अभिनेत्रीच्या कारला कॅनडामध्ये अपघात; मुलीवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु

Rambha Car Accident: बॉलीवूड अभिनेत्रीच्या कारला कॅनडामध्ये अपघात; मुलीवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु

जुडवा, घरवाली बाहरवाली, क्योंकि मैं झूठ नहीं बोलता सारख्या हिट सिनेमांमध्ये कार केलेली बॉलीवूडची अभिनेत्री रंभाच्या कारला अपघात झाला आहे. कॅनडामध्ये रंभाच्या कारचा अपघात झाला. यावेळी कारमध्ये रंभासह तिची मुले आणि मुलांना सांभाळणारी महिला देखील होती. 

कोणाला गंभीर दुखापत झालेली नसली तरी रंभाची मुलगी साशावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. रंभाने मुलीसाठी प्रार्थना करण्याची विनंती फॅन्सकडे केली आहे. रंभाने तिच्या उमेदीच्या काळात हिंदीसह तेलगू, कन्नड, तामिळ, मल्याळम, बंगाली, भोजपुरी आणि इंग्रजी सिनेमांमध्ये काम केले आहे. रंभानेच या कार अपघाताची सोशल मीडियावर माहिती दिली आहे. 

रंभाने तिच्या इन्स्टा आणि ट्विटरवर अपघाताचे फोटो टाकले आहेत. तिच्याकडे टेस्लाची कार होती. उजव्या बाजुच्या पुढील दरवाजावर दुसरी कार आदळली आहे. मुलांना शाळेतून आणत असताना ही घटना घडल्याचे रंभाने म्बटले आहे. आम्हाला हलक्या जखमा झाल्या आहेत. परंतू मुलगी साशा हॉस्पिटलमध्ये असल्याचे तीने म्हटले आहे. गाडीचे फोटो पाहता गाडीतील सर्व एअरबॅग उघडलेल्या दिसत आहेत. 

Web Title: Rambha Car Accident: Bollywood Actress rambha indrakumar's Car Accident in Canada; injured girl is being treated in the hospital