Ramayana Teaser: डोळ्यांत तेज, प्रफुल्लित चेहरा! ‘रामायण’मधील रणबीर कपूरचा पहिला लूक समोर, रामाच्या भूमिकेत पाहून चाहते थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 10:17 IST2026-04-02T10:11:52+5:302026-04-02T10:17:01+5:30

Ramayana Movie Ranbir Kapoor Look :भव्य ‘रामायण’ची सुरुवात: अभिनेता रणबीर कपूरचा 'राम' लूक आला समोर!

ramayana movie ranbir kapoor first look as lord ram fans amazed nitesh tiwari | Ramayana Teaser: डोळ्यांत तेज, प्रफुल्लित चेहरा! ‘रामायण’मधील रणबीर कपूरचा पहिला लूक समोर, रामाच्या भूमिकेत पाहून चाहते थक्क

Ramayana Teaser: डोळ्यांत तेज, प्रफुल्लित चेहरा! ‘रामायण’मधील रणबीर कपूरचा पहिला लूक समोर, रामाच्या भूमिकेत पाहून चाहते थक्क

ज्याची सगळेच आतुरतेने वाट पाहत होते त्या नितेश तिवारींच्या ‘रामायण’ सिनेमाची पहिली झलक हनुमान जयंतीच्या मुहुर्तावर प्रदर्शित करण्यात आली आहे. प्रभू श्री रामाच्या भूमिकेत असलेल्या रणबीर कपूरला पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते. अखेर चाहत्यांची प्रतिक्षा आता संपली आहे. ‘रामायण’चा २.३८ मिनिटांचा छोटा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. यामध्ये ‘रामायण’मधील रणबीर कपूरची श्री राम म्हणूनपहिली झलक पाहायला मिळत आहे. 

‘रामायण’च्या या टीझरमधून या सिनेमातील राम या पात्राची ओळख करून देण्यात आली आहे. यामधून राम यांच्या जीवनप्रवासाची छोटी झलक दाखवण्यात आली आहे. त्यांच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या प्रसंगांची झलकही यात दिसते. याशिवाय पृथ्वीचं रक्षण करणारे, महापराक्रमी, मर्यादापुरषोत्तम राम यांच्या भूमिकेत असलेला रणबीर कपूरचा पहिला लूकही पाहायला मिळत आहे. सिनेमातील काही अॅक्शन सीन्स आणि व्हीएफएक्सची झलकही पाहायला मिळत आहे. 

रणबीर कपूर रामाच्या भूमिकेबद्दल म्हणाला,  “मी रामाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी नाही, तर त्याच्याकडून शिकण्यासाठी येथे आहे. त्याच्यातील साधेपणा आणि शुद्धता अत्यंत दुर्मिळ आहे; आणि ते समजून घेण्याचा प्रवास माझ्यासाठी नम्र करणारा अनुभव आहे.” दिग्दर्शक नितेश तिवारी म्हणतात, "रामायण ची महानता तिच्या भावनिक गाभ्यात आहे. ही फक्त चांगले-वाईट यांच्यातील लढाई नाही, तर निर्णय, परिणाम आणि योग्य गोष्ट करण्याच्या ओझ्याची कथा आहे. रामाचा प्रवास अत्यंत मानवी आहे आणि आम्ही त्याच्याशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न केला आहे.”

'रामायण' हा सिनेमा दोन भागांत प्रदर्शित केला जाणार आहे. रामायण: भाग १ जागतिक स्तरावर दिवाळी २०२६ मध्ये प्रदर्शित होईल. तर भाग २ दिवाळी २०२७ मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूर रामाच्या भूमिकेत, साई पल्लवी सीता माता, रवी दुबे लक्ष्मण, यश रावणाच्या भूमिकेत आणि सनी देओल हनुमानाच्या भूमिकेत दिसणार आहे. 

Web Title : रणबीर कपूर का 'रामायण' का पहला लुक जारी; राम की भूमिका से प्रशंसक हैरान।

Web Summary : नितेश तिवारी की 'रामायण' की पहली झलक जारी, जिसमें रणबीर कपूर भगवान राम के रूप में हैं। टीज़र में कपूर का राम के जीवन की यात्रा, एक्शन सीन और वीएफएक्स का चित्रण दिखाया गया है। फिल्म दो भागों में रिलीज होगी, पहला भाग दिवाली 2026 में रिलीज होगा।

Web Title : Ranbir Kapoor's 'Ramayan' first look revealed; fans stunned by Rama role.

Web Summary : The first glimpse of Nitesh Tiwari's 'Ramayan' is out, showcasing Ranbir Kapoor as Lord Rama. The teaser reveals Kapoor's portrayal of Rama's life journey, action scenes, and VFX. The movie will be released in two parts, with the first part releasing in Diwali 2026.