लॉस एंजिलिसमध्ये झालं 'रामायण'चं स्क्रीनिंग, सिनेमाचा पहिला रिव्ह्यू आउट; प्रेक्षक म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 11:36 IST2026-02-25T11:35:33+5:302026-02-25T11:36:13+5:30

कसा आहे रणबीर कपूरचा 'रामायण'?

ramayana movie first screening held in los angeles among selected audience know their reactions | लॉस एंजिलिसमध्ये झालं 'रामायण'चं स्क्रीनिंग, सिनेमाचा पहिला रिव्ह्यू आउट; प्रेक्षक म्हणाले...

लॉस एंजिलिसमध्ये झालं 'रामायण'चं स्क्रीनिंग, सिनेमाचा पहिला रिव्ह्यू आउट; प्रेक्षक म्हणाले...

नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' सिनेमा यावर्षी दिवाळीत रिलीज होणार आहे. सिनेमा कसा असेल याबद्दल प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. सिनेमाबद्दल बरीच माहिती ही अद्याप गोपनीय ठेवण्यात आली आहे. केवळ एक झलक आतापर्यंत प्रेक्षकांच्या समोर रिलीज करण्यात आली आहे. दरम्यान ठराविक प्रेक्षकांसाठी सिनेमाचं पहिलं स्क्रीनिंग अमेरिकेत पार पडलं. सिनेमा पाहिल्यानंतर त्यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. 

'रामायण'ची पहिली टेस्ट स्क्रीनिंग नुकतीच पार पडली. ताज्या अपडेटनुसार, लॉस एंजिलिसमध्ये मेकर्सने सिनेमाची पहिली टेस्ट स्क्रीनिंग आयोजित केली होती. मीडिया रिपोर्टनुसार, स्क्रीनिंगनंतर प्रेक्षकांनी सकारात्मक आणि उत्साहपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे. चाहते या प्रतिक्रिया सोशल मीडियावर शेअर करत आहेत. 

'द वीक'नुसार, या आठवड्यात लॉस एंजिलिसच्या सिनेमार्क प्लाया विस्टामध्ये निवडक प्रेक्षकांसाठी 'रामायण'चं विशेष स्क्रीनिंग आयोजित करण्यात आलं. या खास स्क्रीनिंगला १८ ते ६० वर्ष वयोगटातील वेगवेगळे प्रेक्षक सहभागी झाले. सर्वांच्याच उत्स्फुर्त प्रतिक्रिया आल्या आहेत. व्हिज्युअल इफेक्ट, इमोशनल स्टोरी टेलिंगचंही कौतुक होत आहे. 

हे स्क्रीनिंग प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठीच करण्यात आलं होतं. जेणेकरुन निर्मात्यांना दिवाळीत सिनेमा रिलीज करण्यासाठी फाइन ट्यून करण्याची संधी मिळेल. 'रामायण'चं बजेट ४००० पेक्षा अधिक कोटींचं असल्याची चर्चा आहे. दिवाळीत याचा पहिला पार्ट रिलीज होणार आहे. तर दुसरा पार्ट २०२७ मध्ये येणार आहे. 

Web Title : लॉस एंजिल्स में 'रामायण' की स्क्रीनिंग: पहली समीक्षाएँ आईं, दर्शक प्रभावित

Web Summary : नितेश तिवारी की 'रामायण' की लॉस एंजिल्स में स्क्रीनिंग हुई, सकारात्मक प्रतिक्रिया मिली। दर्शकों ने दृश्यों और भावनात्मक कहानी की सराहना की। दिवाली रिलीज से पहले फिल्म को ठीक करने में स्क्रीनिंग निर्माताओं की मदद करती है। 4000 करोड़ से अधिक के बजट वाली फिल्म का दूसरा भाग 2027 में रिलीज होगा।

Web Title : 'Ramayana' Screening in Los Angeles: First Reviews Out, Audience Impressed

Web Summary : Nitesh Tiwari's 'Ramayana' screened in Los Angeles, drawing positive reactions. Viewers praised visual effects and emotional storytelling. This screening helps producers fine-tune the film before its Diwali release. The film, with a budget exceeding 4000 crores, will have its second part released in 2027.